घरताज्या घडामोडीफडणवीस म्हणतात... कोणी किती स्ट्रॅटेजी करा; 2024 मध्ये 'आएगा तो मोदीही' !

फडणवीस म्हणतात… कोणी किती स्ट्रॅटेजी करा; 2024 मध्ये ‘आएगा तो मोदीही’ !

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालचे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून येणार्‍या प्रतिक्रिया थांबताना दिसत नाही. या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला मारला आहे.‘कोणीही कितीही स्ट्रॅटेजी करा आजही मोदीजीच आणि 2024 मध्येही मोदीच येणार’.

फडणवीसांना पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले, कोणी कोणाची भेट घ्यावी यावर कुठलेही बंधन नाही. विरोधी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातील लोक आपापल्या परिने स्ट्रॅटेजी तयार करत असतात. परंतु कोणीही कितीही स्ट्रॅटेजी तयार केल्या तरी आजही मोदीजी आहेत आणि 2024 लाही मोदीजीच राहणार आहेत. 2024 च्या निवडणुकीतही मोदींनाच आणि त्यांच्याच नेतृत्वात सरकार येईल त्यामुळे कोणीही स्ट्रॅटेजी करायला हरकत नाही’.

- Advertisement -

सकाळी उठल्यावर आधी केंद्राकडे बोट, मुंबई तुंबण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर येथे पाणी साचतं यामुळे येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलसाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु ही परवानगी उशिराने दिली आहे. यामुळे याला भाजप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार असल्याचे खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे. यावर सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य केंद्र सरकार जबाबदार एवढंच काम यांचं आहे. असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -