दिल्ली : विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते, मंत्री चंद्रकांत पाटील समोरासमोर आले. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून भविष्यात ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या चर्चांवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत पूर्णविराम दिला आहे. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Sanjay Raut Shiv Sena UBT And BJP Alliance In Future)
दिल्लीत आज (30 जानेवारी) साहित्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर भाष्य केलं.
“लग्नात भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तर, माझीही भेट झाली असती. लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते. इतका भाबळा विचार हा किमान तुमचा नसावा”, असं म्हणत ठाकरे-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्णविराम दिला.
हेही वाचा – Sanjay Raut : ठाकरे-भाजपा एकत्र येणार, चंद्रकांत पाटलांशी होतेय जवळीक; नेमकं काय म्हणाले राऊत?