घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध  

देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध  

Subscribe

निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून यात येत्या दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे का? यावर चर्चा होत आहे. सध्या राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध असून शनिवार आणि रविवारी म्हणजेच विकेंडला लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्ण लॉकडाऊनला पर्याय दिसत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटले. परंतु, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. व्यापाऱ्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घ्या आणि मगच योग्य तो निर्णय घ्या, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे.

जीवन चालवायचे कसे हा जनतेसमोर प्रश्न 

कोरोनामुळे मागील वर्ष वाया गेले. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच जनतेला कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

रेमडेसीवर उपलब्ध करून द्या

छोटे व्यापारी आता पूर्णपणे संपले, तर ते पुन्हा उभे राहणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था वाढवण्यावर भर दिला पाहिजे असेही त्यांना वाटते. तसेच RTPCR चाचणीचा रिपोर्ट तात्काळ दिला पाहिजे. रेमडेसीवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेही मत फडणवीस यांनी या बैठकीत व्यक्त केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -