Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रShaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्ग करायचाय, लादायचा नाही; फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्ग करायचाय, लादायचा नाही; फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

Subscribe

बादास दानवे यांनी विशेष उल्लेख म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. यावेळी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावलं पाहिजे, अशी मागणी केली. या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

मुंबई : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विरोध करण्यात येत आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले आहे. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शेतकरी आज (12 मार्च) आझाद मैदानावरील आंदोलनासाठी एकवटले आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांची शिवसेना ठाकरे गटाचे आंबादास दानवे, काँग्रसचे आमदार सतेज पाटील आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी भेट घेतली. यानंतर अंबादास दानवे यांनी विशेष उल्लेख म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. यावेळी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावलं पाहिजे, अशी मागणी केली. या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. (Devendra Fadnavis position is clear on the Shaktipeeth highway issue)

अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाला आता जाऊन भेट दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यामुळे या महामार्गाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अंबदास दानवे यांनी केली. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, तो लादायचा नाही, अशी शासनाची भूमिका आहे. मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत तेथील शेतकरी कोल्हापूर विमानतळावर माझी प्रतीक्षा करत होते. शेतकरी या महामार्गाला विरोध करत असून त्यांच्या सह्याचं निवेदन त्यांनी मला दिलं होतं, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा – Council : कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला, एसटी कामगारांच्या पीएफ प्रकरणी परब -सरनाईक आमनेसामने

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असला तरी शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना हा मार्ग हवा आहे, हा अट्टाहास नाही. परंतु समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यातील जीवन बदललं, तसं शक्तिपीठ महामार्गामुळे देखील जीवन बदलणार आहे. आज जसा मोर्चा आला, त्याच्या तिप्पट कार्यक्रम हा मार्ग व्हावा यासाठी होणार आहे. ज्या गावांमध्य सभा झाल्या, त्या गावात शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. शेतकऱ्यांना जमिनीच्या पाचपट भाव दिला आहे. त्यामुळे हा महामार्ग होण्यासाठी विरोधकांनी देखील मदत करावी, अशी भूमिका फडणवीस यांनी सभागृहात मांडली. मात्र त्यांच्या भूमिकेला सतेज पाटील यांनी विरोध केला.

सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. शक्तिपीठ हा महामार्ग नागपूर ते रत्नागिरीला जोडू शकतो, पण तो रस्ता आधीच आहे. तर दुसरीकडे सोलापूर आणि सांगोल्याच्या लोकांनी शक्तिपीठ महामार्गासाठी रस्ता दिला आहे. त्यामुळे आता सरकारने सोलापूर आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी थोडा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. आज महाराष्ट्रामधील शेतकरी आझाद मैदानात जमले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावलं पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी या महामार्गाला आता परवानगी दिली, त्यांनी आधी विरोध केला होता. त्यामुळे या महामार्गाबाबत फेरविचार करावा, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली.

हेही वाचा – Electricity Rate : राज्यात वीजेचे दर वाढणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा

महाराष्ट्रच्या हितासाठी शक्तिपीठ महत्त्वाचा – फडणवीस

सतेज पाटील यांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रस्त्यांचा विकास केल्यामुळे आपल्यालाच फायदा होणार आहे. विरोधकांचे म्हणणं आहे आपण समजून घेऊयात, पण तुम्ही देखील माझ म्हणणं समजावून घ्या. शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. वाशीम सर्वात दुर्लक्षित भाग होता. परंतु ग्रीनफिल्ड रस्त्यामुळे तो आज सगळ्यात महत्वाचा भाग झाला आहे. नवीन ग्रीनफिल्डमुळे जास्तीत जास्त भाग जोडले जात आहेत. समृद्धी, शक्तिपीठ आणि कोकण महामार्ग आपण बनवणार आहोत. या तीन रस्त्यांसाठी विचार करून जाळं तयार केलं आहे. महाराष्ट्रच्या हितासाठी हा रस्ता काढला जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.