घरताज्या घडामोडीहनुमान चालिसा पठणावर इतका राग का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

हनुमान चालिसा पठणावर इतका राग का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

Subscribe

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करुन राणा दाम्पत्य पुन्हा अमरावतीला परतले असते.त्यांना वेगळ्या मार्गानेसुद्धा हाताळण्यात आले असते असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राणा दाम्पत्याला शिसेनेला मोठं करायचे असल्याचे दिसतय असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच हनुमान चालिसा पठणावरुन एवढा राग का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. जर अशा प्रकारे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात येणार असेल तर गंभीर दखल घेतली पाहिजे असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्यांवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हा जो काही हनुमान चालिसावरुन वाद निर्माण झाला आहे. भाजपने यापूर्वी नेहमीच स्पष्ट केलंय की, कोणाच्याही घरावर आंदोलन करण्यासाठी भाजपचे कधीही समर्थन नसते. परंतु या ठिकाणी आंदोलन नाही तर हनुमान चालिसा आहे. हनुमान चालिसा पठण करायला कोणाला राग येण्याचे कारण नाही. शिवसेनाला राणा दाम्पत्यास राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून द्यायची असेल किंवा नेतृत्व द्यायचे आहे. कारण आले असते कोणत्या तरी कोपऱ्यात उभे राहिले असले हनुमान चालिसा पठण केले असते आणि परत गेले असते. किंवा त्यांना वेगळ्या प्रकारे हाताळण्यात आले असते. मातोश्रीवर लोकं जमा करायचे असा माहोल करायचा की कोणीतरी हल्ला करणार आहे. हे सगळं अनाकलनीय आहे. अशा प्रकारे राज्यातील सरकार कायदा सुव्यवस्था खराब करणार असेल तर याची गंभीर दखल घेतली पाहिजे असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

- Advertisement -

कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीय – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरामीटर्स बदलले आहेत. शनिवारी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करणे, भाजपच्या पोलखोल अभियानासाठी वापरण्यात येणाऱ्या रथाची तोडफोड किंवा आज जो मुंबईत ड्रामा झाला आहे. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिक कालपासून पहारा देत आहेत. पोलिसांनी रामा दाम्पत्याला संरक्षण दिले पाहिजे होते परंतु देऊ शकले नाही. तुम्ही जर संरक्षण देऊ शकला नाही तर सत्ता सोडा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. हनुमान चालिसा म्हणायला विरोध करण्याचे कारण नाही. ही राक्षसी चालिसा नाही. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.


हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मातोश्रीवर जाणार नाही, रवी राणांची माघार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -