नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर मूळ कारवाई नागपूर पोलिसांची, फडणवीसांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

devendra fadnavis reaction on nana patole lawyer satish uke ed action
नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर मूळ कारवाई नागपूर पोलिसांची, फडणवीसांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे. उकेंना ईडीने अटक केली असून कोर्टात हजर करण्यात येणार आहे. उके यांनी फडणवीसांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तसेच भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सतीश उके यांच्यावर यापूर्वीपासूनच काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधातील मूळ कारवाई नागपूर पोलिसांची आहे. त्यावरच ईडीने कारवाई केली असून कायदेशीर मार्गाने तपास सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी फडणवीसांनी उकेंविरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, मला याची काही कल्पना नाही. मी देखील माध्यमांमध्येच पाहिले आहे. एका जमीनीच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्या गुन्ह्यांसदर्भात ईडीला तक्रार केली होती. त्यातूनच ईडीने कारवाई केली आहे मुळ तक्रार महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, त्यांच्याविरोधात २००५ पासून वेगवेगळ्या प्रकारच्या एफआयआर आहेत. तसेच वेगवेगळ्या जजेसची तक्रार खोटी केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला त्यांनी त्याला शिक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये असा सवाल करण्यात आला आहे. हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना जजेसची खोटी तक्रार करण्यासंदर्भात शिक्षा झाली आहे. त्यामुळे कायदेशीर आहे ते कायद्याने होईल असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अल्पसंख्यांकांची मत मिळवण्यासाठी भीतीचे वातावरण

शालेय अभ्यासक्रमात बदल करुन विद्यार्थ्यांमध्ये विष कालववण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणले होते. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पुर्वीपासून चालत आला आहे. या अभ्यासक्रमात तज्ञांनी वेळोवेळी बदल केला आहे. केवळ अल्पसंख्यांकांची मत मिळवण्यासाठी त्यांच्यात भीतीचे वातावरण तयार करण्याचे काम काही नेते करत आहेत. त्यातीलच हा प्रकार आहे. शेवटी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत अल्पसंख्यांकांची मत मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. यामुळेच असे वक्तव्य करण्यात येत आहे असा पलटवार फडणवीसांनी केला आहे.

मेट्रो-३ काम पूर्ण करा अन्यथा अपयशाचे श्रेय घ्याव लागेल

श्रेय वादाची लढाई नाहीच आहे. याचे कारण असे आहे की, पहिल्यांदा आम्हाला अतिशय आनंद आहे. या दोन मेट्रो लाईन्स ज्यांचे काम आम्ही सुरु केले होते ते आता पूर्ण होत आहे. हे मुंबईकरांनाही माहिती आहे की, त्या वेळी किती वेगाने काम करण्यात आले आहे. गेल्या २ वर्षात त्या कामाचा वेग काही कारणास्तव कमी झाला परंतु आता मेट्रो सेवेत येत आहे. आता आमची अपेक्षा आहे की, सगळ्यात महत्त्वाची मेट्रो लाईन कुलाबापासून सीप्झपर्यंत एक मेन फीडर ४० किमीची लाईन आहे. या लाईनला कारशेड मिळाला नाही यामुळे ही लाईन पुढील ४ वर्षे सुरु होऊ शकत नाही. लाईनचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. जर आरेचे कारशेड केले तर ९ महिन्यात लाईन सुरु होऊ शकते. ती लाईन तात्काळ सुरु करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे अन्यथा श्रेय घेता घेता अपश्रेयसुद्धा घ्यावे लागेल आणि याचा त्रास मुंबईकरांना होईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : केंद्राचे प्राधान्य सर्वांसाठी घरे मात्र ठाकरे सरकारचे सर्वांसाठी वाईन, रेडी रेकनर वाढीवरुन शेलारांची टीका