घरताज्या घडामोडीसंजय राऊत यांना कामधंदा नाही त्यांची टीका पोरखेळ, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

संजय राऊत यांना कामधंदा नाही त्यांची टीका पोरखेळ, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

Subscribe

राजभवनातील विधान परिषदेच्या आमदरांच्या नामनियुक्तीच्या फाईलबाबत राजभवन उत्तर देईल

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजभवनात भुताटकी असल्याचे म्हटले आहे. राजभवनात भुताचा वावर आहे. विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीवरुन राज्यपाल राजकारण करत आहेत. फाईल हारवली असल्याचे सांगितले जात आहे. यावरुन संजय राऊतांनी राज्यपालांवर टीका केली होती. राऊतांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांना कामधंदा नाही त्यांची टीका पोरखेळ आहे. त्यांना काय उत्तर द्यायचं? असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच मराठा आरक्षण प्रकरणावर खसाद संभाजीराजेंची भेट ठरली असल्याचेही फडणवीसांनी सांगितले आहे.

राजभवनावर भूतांचा वावर आहे. विधान परिषदे सदस्यांची फाईल या भूताने पळवली आहे. राजभवनावर शांती यज्ञ केला पाहिजे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजभवनातील विधान परिषदेच्या आमदरांच्या नामनियुक्तीच्या फाईलबाबत राजभवन उत्तर देईल. त्याबाबत काही बोलू शकत नाही. परंतु भुताचा वावर ही कसले वक्तव्य आहे. हा निव्वळ पोरखेळ आहे. संजय राऊतांना कामधेंदे नाही आहेत. ते दिवसभर काहीही बोलत असतात. त्यांच्या सर्वच वक्तव्यावर उत्तर द्यायचं नसतं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणावर संभाजीराजे भेटणार

मराठा आरक्षण प्रकरणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणावर संभाजी राजे २७ मे नंतर आपली भूमिका मांडणार आहेत. तसेच २७ तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सध्या संभाजीराजे महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावर विधासभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संभाजीराजे छत्रपती यांच्याशी माझं बोलणं झाले आहे. संभाजीराजे छत्रपती २८ मे रोजी बेठ घेणार आहेत. त्यावेळी मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात येईल अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

राजभवनात भुताटकीचा वावर वाढला

राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. ‘तौकते’ चक्रीवादळात नुकसान झाले. पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना हजार कोटी दिले. मग महाराष्ट्रावर अन्याय का करता? माझ्या राज्यालाही पंधराशे कोटी द्या, अशी मागणी करून राज्यपालांनी ‘मऱहाटी’ जनतेची मने जिंकली पाहिजेत. हे सर्व करायचे सोडून राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -