Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Pandharpur Assembly By election 2021 : योग्यवेळी 'करेक्ट कार्यक्रम' करणारच, सध्या 'ती'...

Pandharpur Assembly By election 2021 : योग्यवेळी ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारच, सध्या ‘ती’ वेळ नव्हेच – फडणवीस

Related Story

- Advertisement -

मी समाधान आवताडेंना निवडून द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारच हे मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटले होते. योग्य वेळी महाविकास आघाडी सरकारचा कार्यक्रम करेनच असाही पुर्नउच्चार राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी केला. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीतील समाधान आवताडे यांचे यश म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वादच असल्याचेही ते म्हणाले. पण कोरोनाच्या संकट काळात आम्ही सरकारची साथ देणार आहोत. त्यामुळे आम्हीदेखील कोरोना विरोधी लढाईत प्रयत्न करतोय. महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम करायची आज योग्य वेळ नाही, असेही ते म्हणाले. योग्य वेळ आली की करेक्ट कार्यक्रम करेनच, त्यावेळी सगळ स्पष्ट होईलच असेही ते म्हणाले. आज मात्र लक्ष कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आहे. सगळे श्रम हे कोरोनाविरोधी लढाईत आणि तयारी करण्यासाठी देत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्मल्यावर मिठाई वाटण्याचा प्रकार

पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निमित्ताने कम्युनिस्ट आणि कॉंग्रेसमुक्त पश्चिम बंगाल झाल्याची परिस्थिती आजच्या निकालातून दिसून येते. भगव्याचा, उजव्या विचारांचा भक्कम पाया आता पश्चिम बंगालमध्ये नागरिकांना स्विकारला आहे, हेच भाजपच्या विजयावरून दिसते असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्मल्यावर इतकी मिठाई वाटत आहेत, जल्लोष करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. ममता दीदी या देश जिंकल्याचा आविर्भाव महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणण्यात आल्याचेही ते म्हणाले.

आता EVM वर कोणी बोलणार नाही 

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने एक गोष्ट झाली ती म्हणजे ईव्हीएमबद्दल आता कोणीही बोलणार नाही. नंदीग्राममध्ये ममता दीदींची दमछाक झाली असेही फडणवीस म्हणाले. बंगालमध्ये सत्ते भाजपा येऊ शकली नाही, म्हणजे मोदी आणि अमित शहा यांनची लोकप्रियता कमी झाली असा अर्थ होत नाही, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी जो सल्ला ममता दीदींना दिला आहे, त्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. केंद्रात काय सुरू आहे, त्यापेक्षा महाराष्ट्रात काय सुरू आहे, याची काळजी उद्धव ठाकरेंनी करावी असाही टोला त्यांनी लगावला.


 

- Advertisement -