Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र म्हणून मी रेमडेसिवीरसाठी पोलीस स्टेशनला गेलो; फडणवीसांचं ज्युलिओ रिबेरोंना उत्तर

म्हणून मी रेमडेसिवीरसाठी पोलीस स्टेशनला गेलो; फडणवीसांचं ज्युलिओ रिबेरोंना उत्तर

मदत करायला गेलो पण त्याचं राजकारण झालं, फडणवीसांचं ज्युलिओ रिबेरोंच्या लेखाला उत्तर

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे रेमडेसिवीर इंजेक्शन वितरीत करणाऱ्या फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. यानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. आता याचा दुसरा अंक सुरु झाला आहे. माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून फडणवीसांवर याप्रकरणी ताशेरे ओढत टीका केली आहे. याला आता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. रेमडेसिवीरसाठी पोलीस स्टेशनला का गेले याचं उत्तर फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला लिहिलेल्या लेखातून दिलं आहे.

राज्याला जास्तीत जास्त रेमडेसिवीर मिळावेत हाच आमचा हेतू होता. राज्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचा छळ होऊ नये यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही ती रेमडेसिवीर भाजपसाठी खरेदी करणार नव्हतो. आमचा फक्त समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न होता, असं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीने चुकीच्या गोष्टी पसरवल्या असून जो चुकीचा प्रचार केला, असं देखील फडणवीस म्हणाले.

काय म्हटलंय लेखात?

- Advertisement -

माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळाबद्दल आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील. यावेळी मला तुमच्याप्रती असणारा आदरही व्यक्त करायचा आहे. आपलं काही मुद्द्यांवर मतांतर असू शकतं, पण तुमच्या स्पष्टवक्तेपणा आणि वचबद्धतेने नेहमीच मला प्रभावित केलं आहे. मी तुमच्या लेखात व्यक्त केलेल्या मतांचा प्रतिकार करण्यासाठी हे पत्र लिहित नाही. महाविकास आघाडीने चुकीच्या गोष्टी पसरवल्या असून जो चुकीचा प्रचार केला आहे त्याबाबत मी तथ्य समोर आणण्यासाठी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी हे लिहित आहे.

मी आणि प्रवीण दरेकर एकही रेमडेसिविर भाजपासाठी खरेदी करणार नव्हतो. आम्ही एफडीएला लिहिलेल्या पत्रातही फक्त समनव्य घडवून आणत असून एफडीएने खरेदी करावी असा उल्लेख केला आहे. प्रवीण दरेकर यांनी उत्पादक कंपनीसोबत एफडीए मंत्र्यांचा संवाद घडवून आणला. यासंबंधी एफडीएकडून त्या उत्पादक कंपनीला अधिकृत पत्र देत फक्त महाराष्ट्राला हा पुरवठा करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राशिवाय इतर कोणाला पुरवठा होण्याची शक्यता नव्हती, असं फडणवीस यांनी त्यांच्या लेखाचत म्हटलं आहे.

म्हणून मी डीसीपी ऑफिसला गेलो

- Advertisement -

कंपनीच्या एका संचालकाला मंत्र्याच्या ओएसडीने फोन करुन विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन तुम्ही रेमडेसिवीर का देत आहात? अशी विचारणा केली. तुम्ही फक्त सरकारच्या सांगण्यावरुन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपण सरकारलाच रेमडेसिवीर देत आहोत. यासंबंधी एफडीए मंत्र्यांशी चर्चा झाल्याची देखील माहिती दिली. त्याच संध्याकाळी एक एपीआय ट्रॅप करण्यासाठी साध्या कपड्यांमध्ये पोहोचले आणि रेमडेसिवीरची मागणी केली. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर आठ ते १० पोलीस आणि एक अधिकारी त्यांच्या घरी गेले. त्यांनी त्यांचा फोन तपासला आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. प्रवीण दरेकर यांनी माझी भेट घेतली आणि काहीतरी गौडबंगाल असल्याचं सांगितलं, असं फडणवीस यांनी लेखात म्हटलं आहे.

 

- Advertisement -