घरताज्या घडामोडीशरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री परंतु कधीच पुर्णवेळ राहिले नाही, फडणवीसांचा खोचक...

शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री परंतु कधीच पुर्णवेळ राहिले नाही, फडणवीसांचा खोचक टोला

Subscribe

देशमुखांवर सीबीआय चौकशी न्यायालयाच्या निर्देशानुसार

मी सलग ५ वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलो आहे. शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री झाले परंतु ते कधीच पुर्णवेळ राहिले नाही. असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. मला आताही मुख्यमंत्री आहे असेच वाटतं असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते यावर शरद पवारांनी टोला लगावला होता. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु कधीही पुर्ण वेळ राहिलो नाही असे शरद पवार यांनी म्हटलं होते. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर देताना पवारांवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले. यावर फडणवीस यांनी म्हटलं आहे की, फरक एवढाच आहे मी सलग ५ वर्ष मुख्यमंत्री राहिले पवार साहेब मोठेच नेते आहेत. ते चार वेळा राहिले परंतु ते कधीच पुर्ण ५ वर्ष राहिले नाही. राहिले असते तर बरच झाले असते त्यांनी चांगलेच काम केले असते. परंतु त्यांच्या काळात काही परिस्थितीमुळे पूर्ण वेळ राहता आले नाही. पण एका गोष्टीचे समाधान आहे मी विरोधी पक्षानेता असून समाधानी आहे त्यामुळे महाविकास आघाडी अस्वस्थ झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पवारांची पत्रकार परिषदेचा विषय कळाला नाही

फडणवीस यांनी म्हटलं आहे की, खरं म्हणजे शरद पवार यांची पत्रकार परिषद कशाला होती हेच कळाले नाही. याचे कारण ते वेगवेळ्या विषयावर बोलले पहिल्यांदा केंद्र सरकारविरोधात बोलले, ते म्हणाले की, मावळमधील गोळीबार पोलिसांनी केला होता. त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की जालियनवाला बागमध्ये गोळीबार करण्याकरता ब्रिटीशांचे जनरल गेले नव्हते तेव्हाच्या पोलिसांनीच केला होता पण त्या गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार करण्यात आला होता. त्यामुळे मावळचा गोळीबार हा ज्यावेळी आम्ही म्हणतो की जालियनवाला बागसारखा होता. त्यावेळी तिथे तेव्हाच्या राज्यकर्त्यांना जाण्याची गरज नव्हती त्यांचे पोलीस त्या ठिकाणी होते असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले आहे.

महाराष्ट्र बंदवर टीका

उत्तर प्रदेशच्या घटनेनंतर इथे बंद करता, इथे हिंसा होते. पहिल्यांदा बघितले की पोलीसांच्या संरक्षणात राज्यकर्त्ये लोकांना मारत आहेत. त्यांचा माल घेऊन पळत आहेत. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. हे नेमकं कुठले राज्य आहे असा सवाल विचारण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेना सामील असल्यावर काय होते हे पवार साहेबांनी सांगितले ही समाधानाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे दृष्य आले त्यात सगळ्यांनी पाहिले आहे. आमदार, कार्यकर्ते पोलिसांच्या उपस्थितीमध्ये लोकांना मारत होते. भीती निर्माण करुन बंद करण्यात आला अशी टीका फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

देशमुखांवर सीबीआय चौकशी न्यायालयाच्या निर्देशानुसार

अनिल देशमुखांवर जी काही कारवाई झाली ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय दिला आहे. राज्यात सरकार आल्यानंतर आमच्या राज्यात सीबीआयने चौकशी करु नये असे सांगितले त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे देशाचे पैसे बुडवले असे प्रकरणे धूळखात पडली आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्याची परवानगी दिली माझा सवाल आहे की, शरद पवार यांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावर विश्वास आहे का नाही. त्यांचे नियम पाळले पाहिजेत की नाही. खरं म्हणजे या संस्थांना वागवणं चाललं आहे ते देखील अक्षेपार्ह असल्याचे फडणवीसांनी सांगितले.


हेही वाचा : मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं; फडणवीसांच्या टीकेला पवारांचं उत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -