घरताज्या घडामोडीउगाच काहीपण मनात येईल ते बोलायचं..; मेडिसीन डिवाइस पार्क प्रकल्पाबाबत फडणवीसांचे आदित्य...

उगाच काहीपण मनात येईल ते बोलायचं..; मेडिसीन डिवाइस पार्क प्रकल्पाबाबत फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेदांत-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या प्रकल्पांपाठोपाठ महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्कला देखील मुकावे लागल्याचं सांगत राज्य सरकारवर टीका केली. दरम्यान, उगाच काहीपण मनात येईल ते बोलायचं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझा त्यांना प्रश्न आहे की, मेडिसीन डिवाइस पार्क हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता याचा एक चिठ्ठीचा तरी ते पुरावा दाखवू शकतात का? उगाच काहीपण मनात येईल ते बोलायचं, ते अडीच वर्ष सत्तेत होते. मात्र अडीच वर्षांत काहीच केलं नाही. केवळ केंद्र सरकारला शिव्या देण्याचं काम केलं आणि आता मनात येईल ते बोलत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

- Advertisement -

वेदांत-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्वीट शेअर करत उपस्थित केला आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -