घर ताज्या घडामोडी Drug Case : दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

Drug Case : दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

Subscribe

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे ड्रग्ज कनेक्शनबाबतचे लावलेले आरोप हे अतिशय हास्यास्पद आहेत. एन दिवाळीत नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावण्याचा प्रयत्न केला आहे. पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेने, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नवाब मलिक यांच्या घरीच गांजा सापडत असेल तर संपुर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीलाच हा निकष लागू पडतो. येत्या दिवसांमध्ये नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असणारे संबंध हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पुराव्यासह ठेवणार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याचवेळी फायनान्स हेड म्हणून फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचे माझे किंवा पत्नीचे काहीही कनेक्शन नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जावई सुटावा म्हणून नवाब मलिकांचे प्रयत्न

रिव्हर मार्चचे गाण तयार करताना हे सर्व काढलेले फोटो आहेत. काही फोटो हे माझ्यासोबतही काढण्यात आले होते. पण जाणीवपूर्वक नवाब मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केला आहे, की फायनान्सशी त्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही. रिव्हर मार्चसोबतचे हे लोक होते. माझा आणि माझ्या पत्नीचा या फायनान्स करणाऱ्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असाही खुलासा फडणवीस यांनी केला. जर फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीमुळेच संपुर्ण भाजप पार्टीचे ड्रग्ज कनेक्शन असल्याचा दावा नवाब मलिक करत असतील तर त्यांच्या घरात स्वतःचे जावई हे गांजासोबत सापडले आहेत. नवाब मलिकांच्या घरी सापडलेला गांजा पाहता संपुर्ण राष्ट्रवादी पार्टीसाठी काय निकष लावावेत असाही प्रश्न त्यांनी केला. आपल्या जावयाच्या प्रकरणात चार्जशीट कमकुवत व्हावी, म्हणूनच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जावई सुटण्यासाठी मदत व्हावी म्हणूनच हा खटाटोप आहे, पण कायदा भक्कम असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

दिवाळी झाल्यावर बॉम्ब मी फोडेन

- Advertisement -

एेन दिवाळीत नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, पण दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन असेही फडणवीस म्हणाले. मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, त्यांनी माझ्याशी बोलू नये, अशीही टीका फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केली. दिवाळीनंतर मी यासंबंधीचे पुरावे मी मांडेन. राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या शरद पवारांकडे नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचे पुरावे देणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी सुरूवात केली आहे, याला अंतापर्यंत न्यावेच लागेल, असाही इशारा फडणवीस यांनी दिला.


हेही वाचा – Drug Case : फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

- Advertisement -
- Advertisement -
Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -