घरताज्या घडामोडीकेंद्र सरकारवर ऑक्सिजन पुरवठ्यावरुन होणाऱ्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

केंद्र सरकारवर ऑक्सिजन पुरवठ्यावरुन होणाऱ्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

Subscribe

ऑक्सीजन साठा वाढवण्यासाठी उच्च स्तरावर पावले उचलण्यात येत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात आॉक्सीजनचा साठा लागत आहे. ऑक्सीजनपुरवठ्यावरुन महाराष्ट्राशी दुजाभाव होत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले होते. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारत सरकारने स्वतः सॉलिसिटर जनरलच्या माध्यमातून तज्ञांची एक राष्ट्रीय टास्क फोर्स तयार केली आणि ऑक्सीजनची आयात व निर्यात राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये केली असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

रोज सकाळी उठून खोट्या बातम्याच एकायला मिळतात असे ट्विट करुन फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राचा हवाला देत फडणवीसांनी राज्य सरकारने ऑक्सीजन पुरवठ्यावरुन केंद्रावर केलेल्या टीकांना प्रत्युत्तर दिले आहे. दिल्ली आणि बऱ्याच राज्यांनी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची मागणी केली होती. यानंतर खोलवर तपास करण्यात आल्यानंतर संपुर्ण भारतात बऱ्याच ठीकाणी ऑक्सीजनचे घोटाळे झाले असल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, भारत सरकारने स्वतः सॉलिसिटर जनरलच्या माध्यमातून, तज्ञांची एक राष्ट्रीय फोर्स तयार करण्याची सूचना केली, जी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनचे वाटप आणि वितरण करण्याची पद्धत निश्चित करेल. या व्यतिरिक्त त्यांनी ऑक्सिजनची पुरेसा साठा असल्याचे सांगितले आहे. तसेच ऑक्सीजन साठा वाढवण्यासाठी उच्च स्तरावर पावले उचलण्यात येत आहेत. तसेच ऑक्सीजन पुरवठ्यामधील अडथळे दूर करण्यसाठी, वाहतुकीसाठी टँकरची आयात करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -