Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला भाजप सहकार्य करणार - फडणवीस

राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला भाजप सहकार्य करणार – फडणवीस

वीज कनेक्शन कापण्याच्या निर्णय थांबवावा - फडणवीस

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे दिसत आहे. राज्य मंत्रिंडळातील सदस्यांनी काही निर्णय घेतल्याचे सागितले आहेत. याबाबत अधिकृत माहिती काही कालावधीत येईल. विकेंडला कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला राज्यातील सर्व जनतेने आणि भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसानी दिले आहे. जास्तित जास्त लोकांना लसीकरण करता यावे यासाठी भाजपचे कार्यकर्ते सहकार्य करतील असा निर्णय घेतला असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय तसेच कोरोनाबाधित मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना रोखण्यासाठी सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयांना सहकार्य करण्याचे ठरविले असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच राज्यात आलेला नवीन स्ट्रेन काय आहे. आणि तो कोणत्या प्रकारचा आहे. याबाबत काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सरकारने सांगितले पाहिजे. नवीन स्ट्रेन त्याची लक्षणे आणि काय काळजी घ्यायची याबाबत सरकारने तज्ञांच्या माध्यमातून राज्यातील लोकांचे प्रबोधन केले पाहिजे.

- Advertisement -

राज्यात मुंबई पुणे सोडूनही उर्वरित जिल्हे आणि महाराष्ट्र आहे. त्यामुळे मुंबई पुणे सोडता इतर जिल्ह्यांवरही सरकारने लक्ष दिले पाहिजे. उर्वरित महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची जबाबदारी ही राज्य सरकारच्या हातता आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेडची कमतरता आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत अधिक माहिती घेऊन आरोग्य सुविधांचा पुरवठा करावा अशी भाजपची मागणी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

वीज कनेक्शन कापण्याचा निर्णय थांबवावा – फडणवीस

तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट यावर राज्य सरकारने अधिक भर दिला पाहिजे. आता राज्य सरकारने सक्तीची कारवाई करुन ४ ते ५ हजार कोटी रुपये वीज ग्राहकांकडून जमवले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता वीज तोडणी बंद करण्यात यावी. लॉकडाऊन आणि मिनी लॉकडाऊनच्या निर्णयामुळे पुन्हा जनतेसमोर आर्थिक आणि रोजगार संबंधी प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती वीज तोडणीचा निर्णय हा तुघलकी निर्णय ठरेल त्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम स्थगित करण्याची विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने गरिबांना मदत करायला पाहिजे. गरिब आणि मध्यमवर्गियांना जगण्यापूरती मदत राज्य सरकारने केली पाहिजे अशी भाजपची आपेक्षा असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

- Advertisement -