Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पवारांनी काँग्रेसचं करेक्ट वर्णन केलंय; फडणवीसांचा खोचक शब्दात निशाणा

शरद पवारांनी काँग्रेसचं करेक्ट वर्णन केलंय; फडणवीसांचा खोचक शब्दात निशाणा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीचं वर्णन करताना काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशच्या जमीनदारासारखी झाली आहे, असं परखड मत व्यक्त केलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी काँग्रेसचं करेक्ट वर्णन केलं आहे, असं म्हटलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन हे दुसरं असू शकत नाही आहे. काँग्रेस आता जुन्या पुण्याईवर जगतेय असं म्हणत वऱ्हाडी भाषेतून टोला लगावला. मालगुजारी तरी गेली, आता उरलेल्या मालावर गुजराण चालली आहे. तशा प्रकारचं वर्णन शरद पवारांनी केलं आहे आणि काँग्रेससाठी चपखल लागू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

- Advertisement -

शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसच्या (Congress) सद्यस्थितीवर परखड शब्दात भाष्य केलं आहे. आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशमधील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. तशीच काहीशी अवस्था आजच्या काँग्रेसची झाली आहे, असं शरद पवार म्हणाले. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.


हेही वाचा – काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशच्या जमीनदारासारखी – शरद पवार


- Advertisement -

 

- Advertisement -