घरमहाराष्ट्रशिवसेना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष, मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा - देवेंद्र...

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष, मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा – देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्यापुढे घराणेशाहीचे मोठे संकट उभे राहिले आहे. पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याने पक्ष चालविणे लोकशाहीला धोकादायक आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असून येणाऱ्या काळात मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि प्रायव्हेट लिमिटेड पक्षाला हटविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.

राज्यातील सध्याची परिस्थिती भयानक आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास जेलमध्ये डांबले जाते. घरे तोडली जातात. संस्कृती पायदळी तुडवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत असून यापुढे महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई महापालिकेचा कारभार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.

मुंबईतील परिस्थिती विदारक असून मुंबई महापालिकेने कोविड काळात प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला. खऱ्या अर्थाने प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे काय ते महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड केले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यानी त्यावर चकार शब्द उच्चारला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळातील घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही घराणेशाहीचा पराभव करणारी ठरेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

भाजप हा लोकांची सेवा करत विस्तारत जाणारा पक्ष आहे. मुळातच पक्षाची निर्मिती राष्ट्रवादातून झाली आहे. भाजप संघर्ष करत जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अनेकवेळा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला पण विचार संपला नाही. पक्षाकडे दोन जागा असताना घाबरलो नाही. आतातर ३०२ जागा आहेत, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.


हेही वाचा – सरकारला धोका नाही, पुन्हा महाविकास आघाडीचंच सरकार येईल – शरद पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -