घरताज्या घडामोडीहिटलर प्रवृत्तीने वागायचं असेल, तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा : देवेंद्र फडणवीस

हिटलर प्रवृत्तीने वागायचं असेल, तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा : देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीच निमंत्रण दिलं होतं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत. त्या घटना बघता या सरकारने संवादाकरीता जागा ठेवलीये असं आम्हाला वाटत नाही आणि कोणी हिटलर प्रवृत्तीने वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा.

‘राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीच निमंत्रण दिलं होतं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत. त्या घटना बघता या सरकारने संवादाकरीता जागा ठेवलीये असं आम्हाला वाटत नाही आणि कोणी हिटलर प्रवृत्तीने वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशाप्रकराची मानसिकता आमची झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याचे’ विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी म्हटले. तसंच, ‘विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायची प्रवृती सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जीवेमारण्याकरता पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही याबाबत फायर नोदवण्याकरीता संघर्ष करावा लागत असेल, तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय?’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात ३ मे पर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. राज यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भोंग्याच्या वादासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला भाजपाने बहिष्कार टाकल्याचे विरोधीपक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात आज मुंबईतील भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना देवेद्र फडणवीस यांनी महाविरास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

“महाराष्ट्रात अशाप्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही. सरकारमधील लोक पोलीस संरक्षणामध्ये विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवेमारण्या करता हल्ला करतात. आम्ही पोल-खोल यात्रा काढली, या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगर पालिकेतील सर्व भ्रष्टाचार आम्ही जनतेपुढे मांडला. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या पोल-खोल सभा आणि रथांवर हल्ला केला. यानंतर त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलण बंद करू, हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई ही सुरूच राहणार आहे.”

“ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. पोलिसांच्या समक्ष आणि झेड सुरक्षेला पुर्वकल्पना दिल्यानंतरही एखाद्याला मारलं जातं. किंवा मोहित कंबोज यांचा मॉबलिंचींगचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे हे फक्त मुंबईत नव्हे, महाराष्ट्र आणि देशभरातील भाजपाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जाताहेत. प्रवीण दरेकरांवर केस टाकली जाते. मी उच्च न्यायालयाचे आभार मानीन की त्यांनी बोगस केस होती आणि यामध्ये दरेकरांना त्यांनी रिलीफ दिला. तर त्यानंतर हायकोर्टावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्थराला आताही नेतेमंडळी पोहोचली असल्याचा आरोपही यावेळी देवेद्र फडणवीस यांनी केला.”

- Advertisement -

“खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकर यांच्या विरोधात 8 खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. तसंच, जे. कुमार गोरे यांच्या विरोधातही खोट्या केसेसे दाखल करण्यात आल्या. एक यादी आहे पोलिसांचा दुरूपयोग हा मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि हा दुरूपयोगच आहे कारण यांची एकही केस टिकली नाही, असा आरोप देवेद्र फडणवीस यांनी
केला. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा काय? असा सवाल त्यानी उपस्थित केला.”

“या गृहमंत्र्यांना काही अधिकार आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुंबईत जे काही सुरू ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. त्यामुळे ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीच नाही त्या बैठकीत गृहमंत्री आम्हाला बोलवून काय करणार? आणि कोणता निर्णय घेणार?” असे प्रश्न उपस्थत करत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.


हेही वाचा – केंद्र सरकारने भोंग्यांबाबतचे धोरण देशभरात लागू करावे – वळसे पाटील

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -