घरताज्या घडामोडीभाजपकडून कोकणाला ९ ट्रक जीवनावश्यक वस्तू रवाना, दररोज मदत पोहचवणार - देवेंद्र...

भाजपकडून कोकणाला ९ ट्रक जीवनावश्यक वस्तू रवाना, दररोज मदत पोहचवणार – देवेंद्र फडणवीस

Subscribe

पाणी वळवण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे - देवेंद्र फडणवीस

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नागरिकांना मदत पाठवण्यात येत आहे. भाजप आणि भाजप युवा मोर्चा मुंबईच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे ९ ट्रक कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच येत्या दिवसांमध्ये मदत पाठवण्यात येणार असून कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यावेळी शरद पवार यांच्या वक्तव्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी सवांद साधला यावेळी फडणवीस यांनी माहिती दिली की, भाजप आणि भाजप युवा मोर्चा मुंबईच्या वतीने ९ ट्रक जीवनावश्यक वस्तूंचे पूरग्रस्त भागात चालला आहे. यामध्ये प्लास्टिक चटई, घरगुती आवश्यक गोष्टी पाठवण्यात आल्या आहेत. रोज काही गोष्टी पाठवण्यात येतील. कोकणा पूरग्रस्त घरात काहीच उरलं नाही यामुळे लोकांना आवश्यकता आहे. दौऱ्यादरम्यान नागरिकांची आवश्यकता समजून घेतली आहे. त्यानुसार भाजप मदत करणार आहे. भाजपचे वेगवेगळे घटकही स्थानिकांच्या आवश्यकतेप्रमाणे जी काही सामुग्री येईल ती सातत्याने पाठवून मदत करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शरद पवार यांच वक्तव्य योग्यच

शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना जे दौरे करणारे आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणांवर येऊ नये. मी विरोधी पक्षनेता आहे त्यामुळे आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा उपस्थित नसते. तसा सरकारने जीआरही काढला आहे. मात्र दौरे महत्त्वाचे आहेत. आम्ही गेल्यावर शासकीय यंत्रणा जागी होते आणि यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचे लोकांचा आक्रोश समजून घेता येतो आणि सरकारपर्यंत पोहचवता येतो. यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्याचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, बचावकार्य आपल्या दौऱ्यामुळे थांबू नये ते त्यांचे बरोबर आहे. परंतु आम्ही दौरा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा दौरा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका कार्यक्रमासाठई गेलो होतो. यावेळी राज्यापाल यांनी चर्चेदरम्यान सांगितं आहे की, राष्ट्रपतींनी सुचना केली आहे की पूरग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे. या नुसार राज्यातील ४ पक्षांच्या प्रमुखांना माझ्यासोबत बोलवलं असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपकडून आशिष शेलार गेले आहेत. राज्यपालांचा दौरा राजकीय होऊ नये यासाठी सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहावे यासाठी प्रतिनिधी बोलवण्यात आले होते. परंतू बाकीच्या पक्षांचे नेते का उपस्थित राहिले नाही याची कल्पना नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

- Advertisement -

संरक्षण भींत योग्य ठरेल का? असा प्रश्न केला असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारने काय ठरवलं याची कल्पना नाही. मात्र संरक्षण भींत बांधणे हा योग्य उपाय नाही कारण पाणी भींतीच्या वरुन जाणार आहे. हे पावसाचे पाणी नाही धरणाचा विसर्ग केल्यावर ४ दिशेने पाणी एकत्र येते यामुळे हा पर्याय फारसा उपयोगी पडणार नाही. परंतू पाणी वळवण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे. मागील युतीच्या सरकारच्या काळात हा प्रकल्प हाती घेतला होता यासंदर्भात वर्ल्ड बँकेसोबत बैठक झाली होती. त्यांनी तत्वतः मान्यता दिली होती तोच प्रकल्प राज्य सरकारने पुढे नेला तर फायदा होईल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -