घरमहाराष्ट्रफडणवीस बोलले मनसेसोबत युती करणार नाही; आता बाळा नांदगावकर म्हणतात..

फडणवीस बोलले मनसेसोबत युती करणार नाही; आता बाळा नांदगावकर म्हणतात..

Subscribe

तसेच रावसाहेब दानवेंनी जनतेनं सांगितल्यास मनसेसोबत युती करू, असं म्हटलं होतं, त्यावर नांदगावकर म्हणाले, जनता सार्वभौम आहे म्हटल्यानंतर विषयच येत नाही ना आणि राम राज्य आणायचं आहे तर सार्वभौम रामराज्याकडे आम्ही चाललेलो आहोतच, असंही बाळा नांदगावकरांनी अधोरेखित केलं.

औरंगाबादः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलंय. त्यालाच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेच्या शिष्टमंडळानं औरंगाबाद पोलिसांची भेट घेतलीय, त्यानंतर बाळा नांदगावकर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस बोलले युती करणार नाही, आम्ही कुठे बोललो युती करा म्हणून. त्यांचा अजेंडा वेगळा आहे आणि आमचा अजेंडा वेगळा आहे, असंही बाळा नांदगावकर म्हणालेत.

तसेच रावसाहेब दानवेंनी जनतेनं सांगितल्यास मनसेसोबत युती करू, असं म्हटलं होतं, त्यावर नांदगावकर म्हणाले, जनता सार्वभौम आहे म्हटल्यानंतर विषयच येत नाही ना आणि राम राज्य आणायचं आहे तर सार्वभौम रामराज्याकडे आम्ही चाललेलो आहोतच, असंही बाळा नांदगावकरांनी अधोरेखित केलं.

- Advertisement -

हिंदू जननायक हे उत्तर प्रदेशवरून आलं. तिकडच्या लोकांना कळलं की हा माणूस आता हिंदूंसाठी देशात एकच तारणहार आहे. आता मी काय करणार, आता चंद्रकांत खैरेंवर फार काही बोलण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

पोलिसांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर म्हणाले, गाडीनं यायचं आणि तसंच परत निघून जायचं आहे. कुठेही गडबड करायची नाही. कारण पोलिसांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे. आपल्याला मदत केलेली आहे. त्यामुळे आपणही त्यांना मदत करायची आहे. अशा सूचना आमच्या त्यांनाही आहेत. अटी आणि शर्थी काहीही नाहीत. कायद्याची बाब फक्त पाळायला पाहिजेत. त्यांनी आम्हाला गाईडलाईन दिल्यात, तो एक भाग असतो. तो कायद्याचा एक भाग म्हणून त्यांनी त्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. घटनेनं प्रत्येकाला वेगळा अधिकार दिलेला आहे आणि त्याप्रमाणे तो वापरत असतो. त्यावर पोलीस खातं आणि सरकार उत्तर दिलं जाईल, त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. सभेला विरोध कोण करतंय मला माहीत नाही, पण आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. तुम्ही पाहिलात की आम्ही शिवजयंती किती जोरात साजरी केली. आंबेडकर जयंती केवढी जोरात साजरी केली. येणारे प्रत्येकाचे सण आम्ही साजरे करतोच ना. आता आम्ही आनंदानेच सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

पोलीस सक्षम आहेत आणि पोलिसांना सहकार्य करणं आमचं कर्तव्य आहे. आता आम्ही सक्षम झालो तर वाद होईल ना, आपल्याला वाद नको आहे. आपल्या लोकांशीच आपण वाद काय घालायचे. घरातल्या घरात आपल्या लोकांनी वाद करू नये. सगळ्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली आहे. मीटिंग झाल्यावर बारीक गोष्टींवरही चर्चा झाली. आमच्या सगळ्या सूचना स्वीकारल्या. त्यांच्याही सूचना आम्ही स्वीकारल्या. त्यामुळे मीटिंग उत्तम प्रकारे पार पडेल. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवणार आहे. सभा संपल्यानंतर आम्ही जास्त खूश होणार आहोत.

देवेंद्र फडणवीस बोलले युती करणार नाही, आम्ही कुठे बोललो युती करा म्हणून. त्यांचा अजेंडा वेगळा आहे आणि आमचा अजेंडा वेगळा आहे. जनता सार्वभौम आहे म्हटल्यानंतर विषयच येत नाही ना आणि राम राज्य आणायचं आहे तर सार्वभौम रामराज्याकडे आम्ही चाललेलो आहोतच.

हिंदू जननायक हे उत्तर प्रदेशवरून आलं. तिकडच्या लोकांना कळलं की हा माणूस आता हिंदूंसाठी देशात एकच तारणहार आहे. आता मी काय करणार, आता चंद्रकांत खैरेंवर फार काही बोलण्याची गरज नाही.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -