गोपीनाथ मुंडे असते तर राज्य सरकारची हिंमत नसती झाली, ओबीसी आरक्षणावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

गोपीनाथ मुंडे नेहमी सांगत असायचे की, कधी सत्तेसोबत समझोता केलात तर तुम्ही कधीही नेता बनू शकत नाही.

devendra Fadnavis says If Gopinath Munde alive the state government would not have had the courage to cancel OBC reservation
गोपीनाथ मुंडे असते तर राज्य सरकारची हिंमत नसती झाली, ओबीसी आरक्षणावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

भाजप नेते आणि महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच जर गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची राज्य सरकारची हिंमत झाली नसती असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचे अनावरण करण्यात आले आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत माझ्यासारख्या समान्य कार्यकर्त्याला त्यांनी नेता बनवल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत राज्यात, विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली, गोपीनाथ मुंडे नेहमी सांगत असायचे की, कधी सत्तेसोबत समझोता केलात तर तुम्ही कधीही नेता बनू शकत नाही. याउलट सत्तेसोबत संघर्ष केला तर तुम्ही नेता बनू शकता. तसेच सतत सत्तेसोबत संघर्ष करणं हा त्यांचा स्थायीभाव होता अशी आठवण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींच राजकीय आरक्ष रद्द झाले आहे. जर गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षणास धक्का किंवा रद्द करण्याची या सरकारची हिंमतच झाली नसती असे फडणवीसांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडेंनी एका नाथ्रासारख्या छोट्या गावातून येऊन देशात आणि विदेशात नाव कमवले आहे. तसेच देशाच्या राजकारणात मुंडेंनी आपल्या नावाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. मुंडेंनी युतीच्या सरकारमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद भुषविले त्या काळात मुंबईतील दहशत पसरवणाऱ्या टोळीला संपवण्याचे काम केले आहे. राज्याताली लोकं मुंडेंना पाहायला आणि त्यांचे भाषण ऐकायाल नेहमी आसुसलेले असायचे अशी आठवण फडणवीसांनी सांगितली आहे. गोपीनाथ मुंडे आपल्यासोबत नाहीत परंतु त्यांच्या विचार आणि दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे फडणवीसांनी म्हटले आहे.