PM केअर फंडातील व्हेंटिलेटर्स योग्य पद्धतीनं सुरु, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची

Devendra Fadnavis says PM Care Fund Ventilators working properly in parbhani
PM केअर फंडातील व्हेंटिलेटर्स योग्य पद्धतीनं सुरु, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

परभणीतील कोरोना परिस्थितीचा विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. यावेळी फडणवीसांनी परभणीतील रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना माहिती दिली की, पीएम केअर फंडातून मिळालेले सर्व व्हेंटिलेटर उत्तम कार्यान्वित आहेत. याच व्हेंटिलेटरवर रुग्णांना उपचार दिला जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळजी घेणं गरजेचे असल्याचे फडणवीसांनी म्हटलंय तर राज्य सरकारने कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांना निश्चित केलेलं दराची घोषणा केली आहे. ही मागणी खूप आधी केली होती पंरतु ५० लाख रुग्णसंख्या झाल्यानंतर राज्य सरकारने घोषणा केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता परंतु आता तो १० टक्क्यावर आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत होतोय हे समाधानकारक आहे परंतु ५ टक्क्यांच्या खाली आला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः तीन महिन्यांच्या कालावधीत ४० हजार रुग्णवाढ झाली होती. प्रशासनानं आणि डॉक्टरांना चांगली मेहनत केली आहे. आपल्याला पुढील उपाययोजनांसाठी काही तयारी करणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यासोबत कोरोना लसीकरणही महत्त्वाचे आहे.

केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर उत्तम

परभणी कोविड रुग्णालयात गेल्यावर तेथील डॉक्टरांनी सांगितले की पीएम केअरमधून मिळालेले सगळे व्हेंटिलेटर काम करत आहेत. त्याच व्हेंटिलेटरवर रुग्णांना उपचार केला जात आहे. औरंगाबादमध्ये एका कंपनीच्या व्हेंटिलेटरचा प्रॉब्लेम झाला बाकी तिथले पुर्वीचे व्हेंटिलेटरही चालू आहेत. परंतु इथे कोणताही अडथळा आढळला नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

म्यूकरमायकोसिसचे ट्रॅकिंग करणे आवश्यक आहे. त्याचे ट्रॅकिंग केले तर म्यूकरमायकोसिस प्रतिबंधित करु शकू असे मत देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारने कोरोना उपचारावरील खासगी रुग्णालयांचे दर निश्चित केले आहेत. या घोषणेला खूप उशीर झाला आहे. ३ ते ४ महिन्यांपुर्वीच याबाबतची मागणी केली होती. आता ५० लाखपेक्षा रुग्ण झाल्यानंतर ही घोषणा केली आहे. वेळेत घोषणा झाली असती तर लाखो रुपयांचे बिलं द्यावी लागलेत ती द्यायला लागली नसती असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची

वादळामुळे जळगाव,परभणीच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे मागत आहेत. याबाबत राज्य सरकारला जाब विचारणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. केंद्राचा यामध्ये काही अधिकार नाही आहे. राज्य सरकारने विमा काढण्यास उशीर केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.