Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र केंद्र सरकारने देशात सर्वात जास्त लसीचा साठा महाराष्ट्राला दिला - फडणवीस

केंद्र सरकारने देशात सर्वात जास्त लसीचा साठा महाराष्ट्राला दिला – फडणवीस

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, म्हणून देशात सर्वाधिक लसीकरण करणारं राज्य ठरलं, असं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. केंद्र सरकारने लसी दिल्या म्हणूनच सर्वाधिक लसीकरण करण्यात आलं, असं फडणवीस यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीलला जाऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, असं फडणवीस म्हणाल्या. केंद्र सरकार महाराष्ट्राला जेवढा पुरवठा करायला हवा तेवढा करत नाही आहे, असा आरोप केला जात आहे. या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी असा कोणीही आरोप केलेला नाही, असं म्हटलं. केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या. देशात सर्वात जास्त लसीकरण हे महाराष्ट्राने केले आहे, त्यामुळे केंद्रांनी मोठ्या प्रमाणात लसी दिल्या म्हणूनच हे करता आलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

लसीचे नियोजन करावं लागेल

- Advertisement -

१८ ते ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण करावे लागेल असा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही. लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो आहे, याचा विचार करून नियोजन करावे लागते. एका दिवसात सर्व लसी तयार होत नाहीत, अशी सूचनाही फडणवीस यांनी यवतमाळमध्ये बोलत असताना दिली.

 

- Advertisement -