मुंबई : विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती दिली. (Devendra Fadnavis says the government is planning to conduct all MPSC competitive exams in Marathi)
मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठी भाषेतून घेण्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न विचारला होता. यावर माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर देताना म्हटले की, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठी भाषेतून ही परीक्षा घेण्याबाबतची शक्यता तपासून धोरण ठरवण्याचे अंतरिम आदेश 1 सप्टेंबर 2022 रोजी दिले आहे. यावर मिलिंद नार्वेकर म्हणाले की, आपली महाभारतीच्या वेबसाईटवर जनरल अॅग्रीकल्चर आणि अॅग्रीकल्चर सायन्स या परीक्षा इंग्रजीमध्ये असल्याचे समोर येत आहे. याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी दिली.
हेही वाचा – Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्ग करायचाय, लादायचा नाही; फडणवीसांचे विरोधकांना उत्तर
According to the new education policy, engineering exams can be conducted in Marathi…
Also, technical courses for which ‘MPSC’ examinations are not conducted in Marathi, their books will be made available in Marathi,
and the examinations will also be conducted in Marathi.नवीन… pic.twitter.com/yIANWcWodN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2025
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण, आता अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करून सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन शासनाने केले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.