राजकारणात कोणालाही न घाबरणाऱ्या फडणवीसांना स्मशानभूमी उद्घाटनाची भीती, फडणवीसांनीच सांगितला किस्सा

Nagar Panchayat Election devendra fadnavis reaction bjp is nomber one party in maharashtra
धनशक्ती सत्तेचा गैरवापर केला तरी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

राजकारणात कोणालाही न घाबरणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्मशानभूमीचे उद्घाटन म्हटलं की थोडे घाबरतात याचे कारण देवेंद्र फडणीस यांनी सांगितले आहे. एकदा स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी गेल्यावर तिथे घडलेल्या प्रकारामुळे फडणवीस नेहमीच स्मशानभूमीच्या उद्घाटनाची भीता वाटायला लागली आहे. कारण पहिल्यांदा जी घटना घडली त्यानंतर स्मशानभीच्या कार्यक्रमाला जायला थोडी भीतीच वाटते असे देवेंद्र फडणवीस यांनी एक किस्सा सांगताना म्हटलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. लोणावळ्यातील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी एक स्मशानभूमीच्या उद्घाटनावरुन एक किस्सा सांगितला आहे. फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे की, स्मशानभूमी बघण्यासाठी गेलो होतो. चांगल्या प्रकारे ही स्मशानभूमी तयार केली आहे. परंतु खरं सांगयाचे झाल्यास स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी चला म्हटलं की, मला थोडी भीती वाटते असं फडणवीस म्हणाले. तसेच याचे कारण म्हणजे मी नागपुरचा महापौर असताना एका स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गेलो होतो. तेव्हा विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागात एक स्मशानभूमी तयार झाली होती. तिथे गेल्यावर कोनशीलेचे अनावरण केले. त्यांनी आग्रह केला की, स्मशानभूमी बघायला चला. तिकडे गेल्यावर पाहिले की लाकडं आणून ठेवली होती.

मला पहिलं लाकूड ठेवायला सांगितले त्यानंतर इतरांनी लाकडं रचली तेवढ्यात कोणाचातरी मृतदेह तिथे आणला गेला होता, त्याच लाकडांवर तो मृतदेह ठेवला. एक टेंभा पेटला आणि तो टेंभा माझ्या हाती देण्यात आला. माझ्या हाताने ते सरण पेटवण्यात आले त्यामुळे कोणी स्मशानभूमीच्या उद्घाटनाला बोलवलं तर भीती वाटते पण इथे तुम्ही चांगल्या प्रकारे उद्घाटन केले तशी कोणतीही वेळ माझ्यावर आणली नाही. यासाठी तुमचे आभार असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. फडणवीसांनी सांगितलेल्या प्रकरणावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.


हेही वाचा : मी सीडी बाहेर काढली तर भाजपला तोंड दाखवायला जागा उरणार नाही; नवाब मलिकांचा इशारा