Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : तडीपार करण्यासारख्या काही केसेस आहेत का? फडणवीसांचे जरांगेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : तडीपार करण्यासारख्या काही केसेस आहेत का? फडणवीसांचे जरांगेंना प्रत्युत्तर

Subscribe

माझ्याविरोधात आणखी 10 ते 15 केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्रीसाहेब स्वप्न बघायचे कमी करा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जरांगेंच्या या वक्तव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्याविरोधात आणखी 10 ते 15 केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्रीसाहेब स्वप्न बघायचे कमी करा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जरांगेंच्या या वक्तव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘असं कधी कोण कोणाला तडीपार करत नाहीत. तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलंय का? तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर काही केसेस आहेत का? असंही काही नाही’, असे म्हणत फडणवीसांनी जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिले. (devendra fadnavis slams manoj jarange patil)

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीदरम्यान माध्यमांशी संवाद साधतना देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले. “आमचे खूप हितचिंतक आहेत. ते हितचिंतक जरांगे पाटलांना जाऊन काहीना काही सांगत असतात. त्यावर ते कदाचित बोलतात. पण असं कधी कोण कोणाला तडीपार करत नाहीत. तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलंय का? तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर काही केसेस आहेत का? असंही काही नाही. अनेक लोकं वाहत्या गंगेत हात धुवून घ्या, त्यापद्धतीने त्यांना जाऊन काहीना काही सांगत बसतात”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – Manoj Jarange : मला तडीपार करण्याचा प्रयत्न, पण गृहमंत्रीसाहेब…, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

मराठा आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याबाबत फडणवीसांची महत्त्वाची माहिती

मराठा आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे कधीपर्यंत घेण्यात येणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. याशिवाय, “मराठा आंदोलकांवर ज्या कसेस दाखल झाल्या आहेत, त्यापैकी आंदोलनाच्या केसेस आहेत त्या आम्ही मागे घेणार आहोत. पण ज्याठिकाणी जाळपोळ झाली, तोडफोड झाली, पोलिसांवर हल्ला झाला. विशेष म्हणजे ते तिकडे हल्ले करताना दिसत आहेत, अशा केसेस परत घेणे हे शक्य होणार नाही. मात्र, इतर केसेस मागे घेतल्या जाणार असून त्यासंदर्भात काम सुद्धा सुरू केलेले आहेत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“साधारण 24 जिल्ह्यात 492 केसेस दाखल आहेत. त्यापैकी 2 जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात केसेस दाखल आहेत. यापैकी 172 केसेस मागे घेण्याबाबत शिफारस देखील झालेली आहे. त्यापैकी सहा केसेसबाबत पोलिसांनी शिफारस नाकारली आहे. पण आता आचरसंहिता सुरू असून, या काळात छाननी पूर्ण करू आणि आचारसंहिता संपल्यानंतर केसेस परत घेऊ. त्यामुळे सध्या विनाकारण संभ्रम पसरवला जात आहे. सगेसोयरे असतील किवा मराठा आंदोलकांवर गुन्हे असतील, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट घोषणा केलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – LOK SABHA : शाहू महाराजांना सन्मान मग उदयनराजेंचं काय? फडणवीसांचा मविआला सवाल