राहुल गांधींना लाज का वाटत नाही? – देवेंद्र फडणवीस

'राहुल गांधी फक्त भाषणबाजी करतात. त्यांना लाज का वाटत नाही', असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

cm devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचारसभांना सुरुवात केली आहे. या प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्याही राजकारणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेदरम्यान, राहुल गांधींना लाज का वाटत नाही? असा प्रश्न विचारला आहे. ‘राहुल गांधी फक्त भाषणबाजी करतात. त्यांना लाज का वाटत नाही’, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर चौफेर टीका केली. अकोल्यात भाजप उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी फक्त भाषणबाजी करतात. त्यांना लाज का वाटत नाही? पाच पिढ्या सत्तेत असतांना आतापर्यंत गरिबी हटवली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी गांधी घरण्यावर केला आहे. काँगेसचे घोषणपत्र केवळ कोंबड्या विकण्याचे घोषणपत्र असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे आणि राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे काल्पनिक असून फक्त मनोरंजनाचा एक भाग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. एअर स्ट्राईकवरून मुख्यमंत्री म्हणाले की, एअर स्ट्राईक पुरावे फक्त दोनच जणांना पाहिजेत, एक पाकिस्तान आणि दुसरे काँग्रेस. मला जर माहित असते तर काँग्रेसचा एखादा नेता मिसाईल सोबत पाठवला असता, अशी गंभीर फटकेबाजी करत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्याचे टाळले. मात्र, प्रकाश आंबेडकरांचे धोरण केवळ मोदींना शिव्या घालण्याचे धोरण असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी आंबेडकर यांच्यावर केला आहे.