पुन्हा येईन, म्हणालो होतो, पण एकटा आलो नाही; टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांनी झापलं

माझी खूप टिंगल टवाळी झाली. मी कविता म्हटली होती मी पुन्हा येईल त्यावरुन माझी टिंगल केली. पण मी आलो आणि यांना घेऊन आलो. एकटा आलो नाही तर यांना सोबत घेऊन आलो आहे. ज्यांनी टिंगल टवाळी केली आणि ज्यांनी अपमान केला त्यांचा मी बदला घेणार

Devendra Fadnavis slams opposition will not came alone with eknath shinde
पुन्हा येईन, म्हणालो होतो, पण एकटा आलो नाही; टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांनी झापलं

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची बहुमत चाचणी होती. शिंदेंनी ही लढाई जिंकली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना विरोधकांना चांगलेच झापलं आहे. मी पुन्हा येईल असे म्हटलो होतो यावरुन माझी टिंगल उडवली परंतु मी एकटी आलो नाही. तर त्यांना सोबत घेऊन आलो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ज्यांनी माझी टिंगल केली त्यांना मी सोडणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात भाषण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाचे कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, पुन्हा येईल म्हणालो होतो पण एकटा आलो नाही, टिंगल करणाऱ्यांनाही फडणवीसांनी झापलं आहे. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सांगितले होते हे सरकार अनैसर्गिक आहे. माझी खूप टिंगल टवाळी झाली. मी कविता म्हटली होती मी पुन्हा येईल त्यावरुन माझी टिंगल केली. पण मी आलो आणि यांना घेऊन आलो. एकटा आलो नाही तर यांना सोबत घेऊन आलो आहे. ज्यांनी टिंगल टवाळी केली आणि ज्यांनी अपमान केला त्यांचा मी बदला घेणार आणि माझा बदला एवढाच आहे की, त्यांना मी माफ करणार, राजकारणामध्ये प्रत्येकाची वेळ येते. दुनिया के सारे शौक पाले नही जाते. कांच के खिलौने हवा मे उछाले नही जाते, या काव्यात फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच झापलं आहे.

सत्ता आमचे साध्य नाही तर सत्ता आमचे साधन

आमच्याकडे मँडेट असताना विरोधात बसायला लागले तरी आम्ही विचलीत झालो नाही सातत्याने विरोध केला जनतेचे प्रश्न मांडले. जनतेमध्ये राहिलो स्वतःची पर्वा केली नाही. काही लोकांना वाटायचे की आम्ही सत्तेसाठी काही करतो आहे. आमचा विचार सांगतो सत्ता आमचे साध्य नाही तर सत्ता आमचे साधन आहे. सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन करण्याचे साधन आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही

आमचे नेते मोदी यांनी या देशात दाखवून दिले. आमच्याकडे सत्ता महत्त्वाची नाही. आम्ही जो या ठिकाणी आमची खंत होती. ती एवढीच होती की, जनतेनं बहुमत दिलं आणि त्यानंतर आमच्याकडून हिरावून नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही सरकार करु आणि आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करु आणि जनतेनं जे मँडेट दिलं होते त्याचा सन्मान करु, आमच्या नेतृत्वाने मला आदेश दिला की, उपमुख्यमंत्री म्हणून काम करा, ज्या पक्षाने सर्वोच्च स्थानावर बसवलं त्यांनी मला जर घरी बसण्यास सांगितले तरी घरी बसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी उभा आहे. त्यांची कारकिर्द यशस्वी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. कधीही पावर स्ट्रगल, कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही. कधी आम्ही सोबत होतो विरोधी बाकावर होतो पण आमची मैत्री कायम राहिल. आम्ही कधी मैत्री मोडली नाही. खर तर एवढच सांगतो जेव्हा जेव्हा सत्ता निरंकुश होते तेव्हा चाणक्याला चित्रगुप्त शोधावा लागतो आणि सत्ता खाली आणावी लागते.

राज ठाकरेंची लवकर भेट घेणार

संघ संघाची भूमिका संघाची शिस्त असे शरद पवारांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. मनसेचे नेते राज ठाकरेंनी सुंदर वक्तव्य केलं आहे. त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यासारखे शब्द सुचले नाही. त्यांचे फोन करुन आभार मानले आहेत. ते आजारी आहेत लवकरच भेट घेईल.

आमदार ईडीमुळे आले हे खरं पण ते..

मंडळी ईडीमुळे आली आहे. पण ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे. एका एका नेत्यावर आमच्या ३० ३० केस आहे. खासदारावर अशी केस टाकली की देवदर्शनाला गाडी नेली आणि भाडं दिलं नाही. गिरीश महाजन यांच्यावर मोका लागला असता बर झालं असते लागला असता तर पण नाही लागला. हनुमान चालीसामुळे घरं तोडायला तयार होतात. पण माझं नशीब आहे. मुंबईत माझं घर नाही.

विरोधात बोलल्यास जेलमध्ये टाकतात

कोणाच्या बाजूने वाईट लिहू नये आणि लिहिल्यानंतर काही लोकं जेलमध्ये आहेत. कोणत्या लोकशाहीमध्ये आपण आहे. एक एक महिना तुम्ही जेलमध्ये टाकता. हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम रद्द केला तरी १२ दिवस जेलमध्ये ठेवता. महिला खासदार जेलमध्ये ठेवता. यावर नंतर चर्चा करू. महाराष्ट्रात आजही आपण एकमेकांच्या घरी जाऊन जेवण करु शकतो.

कोणत्याही आकसाने हे सरकार काम करणार नाही

सत्तारुढ पक्ष असेल विरोधी पक्ष असेल भूमिका बदलतात. आमची वेगळी भूमिका होती आणि आता वेगळी भूमिका आहे. जो व्यक्ती सत्तेवर, आमदार, मुख्यमंत्री आणि कोणीही असो प्रत्येकाने लक्षात ठेवावं की लोकांसमोर जायचे आणि त्यांना उत्तर द्यायचे आहे. कोणत्याही आकसाने हे सरकार काम करणार नाही. काही गोष्टी स्थगित होतील पण मेरीटमध्ये होतील चांगले निर्णय आम्ही कायम करु तसेच कसे पुढे नेता येतील त्याचा प्रयत्न करु.

हा मुख्यमंत्री एका फोनवर उपलब्ध असेल

एक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा एकूण जर आपण कारकिर्द पाहिली तर मला विश्वास आहे. राज्यात एक डेफिसीट तयार झाले होते. नेत्यांच्या उपलब्धतेचे तरी देखील लोकांना आपले नेते आपल्यात हवेत असे वाटत होते. येत्या काळात हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. हा नेता मुंबईत नाही तर महाराष्ट्राच्या कोपऱ्यात उपलब्ध असेल. हा नेता एका फोनवर उपलब्ध असेल तर शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहचण्यापर्यंत हा नेता असेल.

तुमचे निर्णय आम्ही लागू करु

राज्यपालांचे पत्र आल्यानंतर विश्वास प्राप्त होत नाही. तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते. परंतु कॅबिनेट घेतली आणि संभाजीनगर, दि बा पाटीलांचा निर्णय़ घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आमची भूमिका तीच आहे. पुन्हा ते निर्णय कॅबिनेटमध्ये घेऊन पुन्हा लागू करु असा विश्वास तुम्हाला देता. विरोधी पक्षाने आपले सहकार्य द्यावे आणि आपले सहकार्य आम्हाला मिळावे अशी विनंती करतो.


हेही वाचा : शिंदे सरकारने १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधात महाविकास आघाडीची ९९ मते