घरताज्या घडामोडीजातीयवादावरुन फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा, १४ ट्विटमध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट ते काश्मीर...

जातीयवादावरुन फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा, १४ ट्विटमध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट ते काश्मीर फाईल्सचा संदर्भ

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. जातीयवादावरुन शरद पवारांवर टीका करण्यात येत आहे. यातच आता फडणवीसांनी मुंबई साखळी बॉम्ब ते काश्मीर फाईल्सचा संदर्भ देत शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात शरद पवारांमुळे जातीयवाद निर्माण झाला अशी टीका केली होती. यानंतर आता फडणवीसांनी शरद पवार यांनी जातीयवाद कसा केला याबाबत ट्विट करत सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला विरोध होता असे फडणवीस म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये फडणवीसांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशात समाजातील सद्भावना बिघडवण्याचा दृष्टिकोन आणि तशी कृत्ये स्वीकारण्यात येणार नाहीत. शरद पवार जातीय धर्माबाबत तेढ निर्माण करत असल्याचे फडणवीस म्हणाले. शरद पवार यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्यांचा दाखला फडणवीसांनी त्यांच्या ट्विटमध्ये दिला आहे.

- Advertisement -

फडणवीस पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जेव्हा अटक करण्यात आले तेव्हा शरद पवार म्हणाले की, नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे त्यांचा संबंध दाऊदशी जोडण्यात आला, दरम्यान इशरत जहाँ निर्दोष होती असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. तसेच इशरत जहाँच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जे प्रयत्न केले होते त्याबाबतही फडणवीसांनी ट्विट केलं आहे. संविधानात आरक्षणाला विरोध असताना शरद पवार सातत्याने मुस्लिम आरक्षणासाठी पुढाकार घेत होते. अल्पसंख्यांक समाज कोणाचाही पराभव करु शकतो असे विधान शरद पवार यांनी केले होते याचे स्मरण देवेंद्र फडणवीसांनी करुन दिलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये राज्यात हिंदू टेरर हा शब्दप्रयोग पहिल्यांदा कोणी केला, तसेच सच्चर समितीचा अहवाल लागू करण्याची मागणी कोणी केली याचा उल्लेख केला आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १३ वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीमध्ये झाला असल्याचं खोटं शरद पवार यांनीच सांगितले असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काश्मीर फाईल्समध्ये पंडितांच्या वेदना दाखवल्या असताना इतका दुटप्पीपणा का? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हता मग जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना केला आहे.

तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? असा प्रश्न विचारत त्यांनी पवारांवर निशाना साधला आहे.


हेही वाचा : चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -