Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर Devendra Fadnavis : ...तर ती जबाबदारी तुमची होती; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

Devendra Fadnavis : …तर ती जबाबदारी तुमची होती; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे (Amrit Jubilee Year of Marathwada Liberation Struggle) निमित्त साधत आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. जवळपास 7 वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होत आहे. मात्र या बैठकीवर विरोधकांनी जोरदार टीका होताना दिसत आहेत. सरकार मराठवाड्यात फक्त घोषणा करतील, बाकी काहीच करणार नाही, असा टोलाही ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे. दरम्यान, विरोधकांना प्रत्युत्तर देताना बैठकीआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DSM Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, आमच्याकडून जर एखादा निर्णय मागे राहिला असेल तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती, असे म्हणत त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहे. (Devendra Fadnavis so that responsibility was yours Fadnavis targets Thackeray)

हेही वाचा – दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप, जयंत पाटील यांची बोचरी टीका

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजी नगरमध्ये घेतली होती. त्या बैठकीतील जवळपास सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे. त्याची माहिती आम्ही पत्रकारांना देणार आहोत. परंतु आज जे लोक आज म्हणत आहेत की, मागच्या बैठकीत काय झालं? त्यांना माझा सवाल आहे, अडीच वर्षात तुम्ही मराठवाड्यासाठी काय केलं? तुम्ही सरकारमधे होतात. आमच्याकडून जर एखादा निर्णय मागे राहिला असेल तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का? मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं, आता तेच लोक आम्हाला विचारत आहेत. मराठवाड्याला जे दिलं होतं त्याचाही या लोकांनी मुडदा पाडला आहे. या लोकांना मराठवाड्याशी काही घेणंदेणं नाही. जर मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल तर ती हाणून कशी पाडायची हा यांचा कावा आहे, हे कावेबाज लोक आहेत, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत नाही

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या सरकारला सामान्य जनतेशी, शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त कुठलं मंत्रिपद कुणाला द्यायचं? कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा? याच प्रश्नांवरून सरकार आपसात चर्चा करत बसले आहेत. मराठवाड्यात जाऊन पॅकेजची घोषणा केली जाईल. पण प्रत्यक्षात काहीही मिळणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाचा काळ होता. मात्र त्याहीवेळी त्यांनी राज्यातले उद्योग बाहेर जाऊ दिले नव्हते. मात्र या सरकारच्या काळात लोकांना फक्त आश्वासनांशिवाय काहीही मिळालेलं नाही. या सरकारकडून शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत केलेली नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …यासाठी सरकारने वेळ मारून नेली, जरांगेंच्या उपोषणावरून ठाकरे गटाचा शासनावर निशाणा

नाना पटोले काय म्हणाले? 

नाना पटोले म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असली तरी या सरकारकडून अपेक्षा ठेवू नये असंच चित्र सध्या आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाडा विकासासाठी 42 हजार कोटींची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठका घेण्याच्या निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो, असे म्हणताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधीत 35 टक्के व्यवसाय वृद्धी झाली तर, 42 टक्के रोजगार निर्मिती झाली होती. आमच्या सरकारच्या काळात उद्योग, व्यवसायांना चालना मिळाली होती. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र विकासाकडे नेला होता, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त करत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisment -