घरताज्या घडामोडी'राज ठाकरेंसोबत सध्या युती नाही, पण पुढे...' - फडणवीस

‘राज ठाकरेंसोबत सध्या युती नाही, पण पुढे…’ – फडणवीस

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मनसे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. याच आशयाची विधानं देखील मनसे आणि भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे येत्या २३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करतील असा अंदाज देखील काहींनी वर्तवला होता. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्याचं देखील बोललं जात होतं. मात्र, यावर आता खुद्द फडणवीस यांचीच प्रतिक्रिया आली आहे. ‘राज ठाकरेंसोबत माझ्या भेटीगाठी होतच असतात. मात्र, त्या दिवशी माझी त्यांच्याशी भेट झालेली नाही’, असं म्हणत फडणवीस यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र, असं असलं, तरी आगामी काळात ते एकत्र येणारच नाहीत, असंही नाही अशी पुष्टी जोडत फडणवीस यांनी या मुद्द्याभोवतीचं गूढ कायम ठेवलं आहे. लोकमतच्या सरपंच अवॉर्ड या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी वरील स्पष्टीकरण दिलं.


वाचा सविस्तर – राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; हाच का मनसेचा वेगळा पर्याय?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज ठाकरेंसोबत हॉटेलमध्ये भेट झाल्याबद्दल यावेळी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी, ‘राज ठाकरेंसोबत आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत. आमच्या गाड्या हॉटेलमधून बाहेर पडल्या खऱ्या, पण त्या दिवशी त्यांच्याशी भेट झाली नव्हती. शिवाय आमच्या दोघांच्या कार्यपद्धतीत, विचारांत बरंच अंतर आहे. जोपर्यंत हे अंतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाहीत. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. त्यामुळे आमचा दृष्टिकोन व्यापक आहे. पण भविष्यात जर त्यांचंही धोरण असंच व्यापक झाल, तर तेव्हा युतीचा विचार करता येईल’, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -