नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कथित भाजप नेत्याचे कसिनोतील फोटो ट्वीट करत भाजपवर हल्ला चढवला. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला असतानाच खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा माध्यमांसमोर येत माझ्याकडे आणखी फोटो आणि व्हिडीओ असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी थेट संजय राऊत यांच्या मानसिकतेचा उल्लेख केला आहे. (Devendra Fadnavis spoke directly Sanjay Rauts distorted mentality came to light)
नागपूर विमानतळावर दाखल झालेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोबाबत विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत यांची विकृत मानसिकता यातून दिसून येते. ते किती डेस्प्रेट झाले आहेत हे त्यातून दिसून आले. चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या संपूर्ण परिवारासहीत त्या हॉटेलमध्ये थांबले होते. जेथे त्यांनी जेवण केलं, तिथे ते थांबले होते तेथे रेस्टॉरंट आणि कसिनो हे एकत्रच आहेत. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्वीट केला आहे. पूर्ण फोटो जर ट्वीट केला तर दिसून येते की, जेथे बावनकुळे बसलेले आहेत तेथे त्यांची पत्नी आहे, मुलगी आहे पूर्ण परिवार आहे. तेव्हा ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहीजे, त्याची आज गरज आहे. तर एवढं फस्ट्रेशन योग्य नाही असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
हेही वाचा : ‘माझ्याकडे आणखी 27 फोटो- 5 व्हिडीओ’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर पुन्हा हल्लाबोल
असे कृत्य राजकारणाला खालच्या पातळीवर नेणारेच
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो सोशल मीडियावर टाकता. हे सगळं राजकारण खालच्या पातळीवरच नेणारच आहे. यातून राजकारणाची पातळी किती खालच्या पातळीवर तुम्ही घेऊन जात आहात हे दिसून येते.
हेही वाचा : ICC WC 2023 : विराटचा चाहता ‘फ्री पॅलेस्टाइन’ टी-शर्ट घालून मैदानावर; दहशतवादी पन्नूकडून लाखोंचे…
सत्य तेच बाहेर आले
अंतरवाली सराटी येथील लाठीहल्ल्याबाबत आज माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीनंतर ते आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते हे समोर आले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, यापूर्वी देखील मी सांगितले आहे की, कुठे बळाचा वापर करायचा असेल, किंवा कुठे लाठीचार्ज करायचा असेल तर तेथील परिस्थिती पाहून त्या ठिकाणीचे प्रमुख निर्णय घेत असतात. ते काही गृहमंत्र्यांना विचारून किंवा डीजींना विचारून निर्णय घेत नसतात. यात काही नवीन नाही, जे काही सत्य होतं ते तेच बाहेर आलेलं आहे असे म्हणत त्यांनी अंतरवाली सराटीतील लाठीहल्ल्याबाबत जास्त बोलणं टाळलं.