Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? फडणवीसांनी चेंडू अजित पवारांकडे टोलावला

Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? फडणवीसांनी चेंडू अजित पवारांकडे टोलावला

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 27 जानेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच्या आर्थिक संबंधाबाबत पुरावे दिले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी म्हणून वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सत्ताधारी आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विरोधातील नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 27 जानेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच्या आर्थिक संबंधाबाबत पुरावे दिले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis stated that Ajit Pawar will take the decision on Dhananjay Munde resignation)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या तीन दिवस दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. तर दुसरीकडे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडेही बुधवारी (29 जानेवारी) दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी भाष्य केले आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : टॅक्स भरला, विषय संपला; ईडीच्या नोटीसीबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

फडणवीस म्हणाले की, “मंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या कामानिमित्त दिल्लीत आले होते आणि मी माझ्या कामानिमित्त आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. मात्र सकाळी आमची भेट झाली. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. कुठल्याही कामासाठी ते मला कधीही भेटू शकतात आणि मी त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका असेल”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अधिकचं भाष्य करणं टाळलं.

अंजली दमानियांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणार

दरम्यान, समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेल्या कागदपत्रांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (30 जानेवारी) भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, अंजली दमानिया यांनी मला दिलेली कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत. कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ते पुरावे सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आले आहेत. कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतर जी वस्तुस्थिती समोर येईल, त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल, असं मुख्यमंत्री यांनी सांगितले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती.

हेही वाचा – Beed DPDC : बीड डीपीडीसी बैठकीत खडाजंगी; अजित पवारांसमोरच धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे भिडले