Nawab Malik : हसीना पारकरला पैसे दिल्यानंतर मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटमध्ये जो जेलमध्ये होता, असा सहकारी शहावली खान हे दोघेजणं बोगस पॉवर ऑफ अॅटॉर्नी करतात. त्याच आधारावर मुंबईच्या एलपीएस रोडवरील ३ एकरची जागा नवाब मलिकांच्या सॉलिडस कंपनीला विकतात. त्यावेळी तेथील दर हा २ हजार रूपये चौरस फुट इतका होता. परंतु नवाब मलिक यांना ती जागा २५ रूपये प्रति चौरस फुटाने मिळाली. त्यानंतर त्याचे पैसे त्यांनी पंधरा चौरस फुटाने भरले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जन्मठेपेची शिक्षा जो तुरूंगात भोगत आहे, त्याच्याकडून मलिकांनी ही जागा विकत घेतली. महाराष्ट्रामध्ये मुंबईत १९९३ चा बॉम्बस्फोट हल्ला घडवण्याचा हा केवळ आरोप नसून स्कूटरमध्ये बॉम्ब भरण्यासाठी त्याने सर्व कामे केली आहेत. अशा व्यक्तिकडून मलिकांनी जमीन विकत घेतली. एवढचं नाही तर या सौद्याच्या पाठीमागे हसीना पारकर होती. जमिनीसाठी मलिकांनी हसीना पारकरला भेटून पाच लाख रूपये दिले. हसीना पारकरला पैसे दिल्यानंतर मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले आहेत, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.

१९९३ नंतर दाऊदने देशातून पळ काढला. मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये अशा प्रकारचे सौदे करायचे आणि त्या सौद्यातून काळ्या पैश्यांची उत्पत्ती करायची. त्यानंतर त्याच पैशातून महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट हल्ले घडवून आणायचे. अशा प्रकारची भूमिका सातत्याने घडत होती. तसेच पैश्यांची मदत दाऊदची बहीण हसीना पारकर आणि दाऊदला करण्यात आली आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे आहेत. त्याजागेवरून १ कोटी रूपये महिन्याचं भाडं नवाब मलिकांना जातं, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली – प्रवीण दरेकर