Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : आम्ही आधुनिक अभिमन्यूच, चक्रव्यूह तोडला; फडणवीसांचा निशाणा

Maharashtra Election Result 2024 : आम्ही आधुनिक अभिमन्यूच, चक्रव्यूह तोडला; फडणवीसांचा निशाणा

Subscribe

महायुतीला मिळालेल्या यशानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आधीच सांगितलं होतं की, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तोडलेला आहे. 

मुंबई : पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. यानंतर आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) सर्व मतदारासंघाचे निकाल समोर येत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात एकहाती विजय मिळवला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आधीच सांगितलं होतं की, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तोडलेला आहे.  (Devendra Fadnavis statement that the people have made the slogan Ek Hai Toh Safe a success)

आजच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की, संपूर्ण महाराष्ट्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. मोदींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केला आहे. सगळ्यांनी एकत्रित मतदान केलं आहे. मला आमच्या लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानायचे आहेत. त्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले आहेत. यासोबत खऱ्या अर्थाने जो फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता, त्याच्या विरोधात लढणाऱ्या राष्ट्रीय संघटनांचा हा विजय आहे. विशेषत: मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला होता, त्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे आमचे विविध पंथांचे जे संत आहेत, त्यांच्यादेखील हा विषय आहे. ज्यांनी या महाराष्ट्राला एकत्र ठेवलं आहे, त्या सर्वांचा हा विजय आहे. महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहे, त्यांचा हा विजय आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

आम्ही आधुनिक अभिमन्यूच, चक्रव्यूह तोडला

दरम्यान, महाविकास आघाडीवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो काही एक विषारी प्रचार सात्याने झाला, त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनेतेने कृतीतून उत्तर दिले आहे. त्यांचे मी आभार मानतो. मी आधीच सांगितलं होतं की, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तोडलेला आहे. कारण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; ठाकरेंनाही डिवचलं


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -