मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण समोर आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस हे आक्रमक झाले आहेत. ते मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि बीड पोलिसांबाबत अधूनमधून खुलासा करताना करताना दिसत आहेत. आज त्यांनी आरोपी केला की, परळीत काही अधिकारी 20 वर्षांपासून एकाच पोस्टवर आहेत. या अधिकाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी एकाच पोस्टवर एवढी वर्षे राहण्याची परवानगी याची माहिती घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे. सुरेश धस यांच्या आरोपावर खुलासा होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (Devendra Fadnavis the Sartaj of Walmik Karad Sushma Andhare asked this question)
वाल्मिक कराडच्या दिमतीला असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांची बेरीज केली तर 200 पेक्षा जास्त हा आकडा जाईल. लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे आमदार सुरेश धस महिनाभरापूर्वी म्हणाले होते. यानंतर त्यांनी एसआयटी चौकशीत सामील असलेल्या पोलिसांचाही वाल्मीक कराडशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यानंतर एसआयटीमधील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. याचप्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी ट्वीट करताना म्हटले की, कराड आणि पोलिसांचे लागेबांधे असल्याप्रकरणी दर दिवसाला धक्कादायक खुलासे होत आहेत. पण प्रश्न हा उरतो की, गृहखाते इतकं पोखरून निघत असताना, मर्जीतले पोलीस अधिकारी बदली करून आणत असताना गृहमंत्री तथा मुख्यमंत्री काय करत होते? तेच या सर्व आका-बाकांचे सरताज आहेत? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
कराड आणि पोलिसांचे लागेबांधे यावर दर दिवसाला धक्कादायक खुलासे होताहेत.
पण प्रश्न हा उरतो की, गृहखाते इतकं पोखरून निघत असताना, मर्जीतले पोलीस अधिकारी बदली करून आणत असताना सन्मा. गृहमंत्री तथा मुख्यमंत्री काय करत होते की तेच या सर्व आका-बाकांचे सरताज आहेत? @PTI_News @Dev_Fadnavis— SushmaTai Andhare (@andharesushama) January 28, 2025
हेही वाचा – Ajit Pawar : धनंजय मुंडेंवर खालचे कार्यकर्ते खापर फोडतायत, अजित पवारांची कोणावर टीका?
सुरेश धस यांनी काय आरोप केले?
दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आरोप केला की, भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस अधिकारी 15 वर्षांपासून बीडमध्येच आहे. त्याचे 15 जीसीबी आहेत. 100 राखेचे टिपर आहेत. मटकावाल्याची अर्धी भागिदारी आहे. याशिवाय परळी थर्मललाही गेल्या 20 वर्षांपासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवर आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बदली अधिनियम 3 वर्षांचा आहे. जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवर 4 वर्षांपर्यंत राहू शकतात. जर त्यांना पाचव्या वर्षीपण एकाच पोस्टवर राहायचे असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागले. त्यामुळे परळी थर्मलमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20 वर्षांपर्यंत एकाच पोस्टवर राहण्याची परवानगी दिली, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांच्या स्वतंत्र विभागाला पत्र देत आहे, असे धस यांनी सांगितले.
हेही वाचा – Suresh Dhas : ती क्लिप 15 दिवस चालणार, डिलीट करू नका; सुरेश धस यांचे आवाहन