पीएम मोदी, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाचे लोकार्पण – देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

सोमवारी शिंदे गट-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. त्यानंतर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपुरमध्ये जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. आता बंडखोर आमदारही आपल्या मतदार संघात परतले आहे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपुरात परतले असून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्नच आहे. त्यादृष्टीने बैठक सुद्धा झाली. हा अहवाल वेळेत न्यायालयात सादर करण्याला प्राधान्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर प्राप्त व्हावा, हाच उद्देश असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेत त्यांनी मोदी, शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आम्ही करू, अशी घोषणाही फडणवीसांनी केली आहे.


हेही वाचा : नाशिकमध्ये दादा भुसे, सुहास कांदेंना पर्याय शोधा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश