घरमहाराष्ट्रNagpur : आपल्यासोबत बेईमानी झाली... फडणवीस ठाकरेंवर कडाडले

Nagpur : आपल्यासोबत बेईमानी झाली… फडणवीस ठाकरेंवर कडाडले

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी केलेला विश्वासघात आजही देवेंद्र फडणवीस विसरू शकले नसल्याचे दिसून येते. आज (ता. 19 मे) पुन्हा एकदा फडणवीस यांना नागपूरमधील सावनेरमधील भाषणात याबाबतची आठवण झाली असता, त्यांनी ठाकरेंवर शाब्दिक हल्ला केला.

2019 मध्ये शिवसेना आणि भाजपने युती करत विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. पण त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून या दोन जिवलग मित्र असलेल्या पक्षांमध्ये बिनसल्याने शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हाथमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेचा हा घाव जिव्हारी लागल्याने फडणवीसांनी 2022 मध्ये गनिमी कावा करत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. तर त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडत त्यातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची सत्ता आणली. पण उद्धव ठाकरे यांनी केलेला विश्वासघात आजही देवेंद्र फडणवीस विसरू शकले नसल्याचे दिसून येते. आज (ता. 19 मे) पुन्हा एकदा फडणवीस यांना नागपूरमधील सावनेरमधील भाषणात याबाबतची आठवण झाली असता, त्यांनी ठाकरेंवर शाब्दिक हल्ला केला. (Devendra Fadnavis verbal attack on Uddhav Thackeray)

हेही वाचा – त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचा दंगल घडवण्याचा डाव गावकऱ्यांनी उधळला, नाना पटोलेंचा हल्लाबोल

- Advertisement -

सावनेर येथे देवेंद्र फडणवीस यांना पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. मोदींच्या नेतृत्त्वात 2024 मध्ये पुन्हा एकदा देशात भाजपची सत्ता आणायची आहे. त्यासाठी सर्वांना पुढील वर्षभर समर्पण देण्याची गरज आहे, असे सांगितले. जर का सर्वांनी हे समर्पण दिलं तर मग आपल्याला मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही. 2024 मध्ये मोदीजी ज्या ताकदीने निवडून येतील की त्यानंतर भाजपला कोणीही हटवू शकणार नाही, असे फडणवीस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

तुमच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा राज्यात आपली सत्ता..
तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपले सरकार आले आहे. आपल्यासोबत बेईमानी झाली, आपल्या पाठीत खंजीर खुपसला. पण आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपण गनिमी कावा केला आणि पुन्हा आपला किल्ला परत आणला. ज्यांनी बेईमानी केली त्यांना बाजूला ठेवलं. जे वैचारिक मित्र होते. त्यांना सोबत घेतलं आणि पुन्हा एकदा शिवसेना-भाजपचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणले. असा घणाघात यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला. तसेच, गेल्या 9 महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत, अशी माहिती देखील यावेळी फडणवीसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -