घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा; 'बोलघेवडेपणा सोडा, कृती करा'!

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा; ‘बोलघेवडेपणा सोडा, कृती करा’!

Subscribe

गेल्या तीन दिवसांपासून राज्यामध्ये नेत्यांचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पाहणी दौरा सुरू आहे. अशात सरकार तसेच विरोधक दोन्हीचे नेते शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत असून आजही त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या माईकसमोर येऊन बोलतात. पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेणार? त्यामुळे आता सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारने आता जागे झाले पाहिजे. सरकारमधील नेत्यांकडून केवळ टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा सुरु आहे. हे सर्व थांबवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे व तात्काळ कारवाई केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हेही वाचा –

ऑनलाईन शॉपिंगसाईटनंतर मनसेची IPL मध्ये मराठीतून समालोचनाची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -