घरमहाराष्ट्रछगन भुजबळांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस, अंजली दमानीयांच्या दाव्याने खळबळ

छगन भुजबळांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस, अंजली दमानीयांच्या दाव्याने खळबळ

Subscribe

भुजबळांनी केलेल्या या टीकेवर संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, भुजबळांच्या या भाषणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील निशाणा साधला आहे.

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज (ता. 17 नोव्हेंबर) ओबीसी समाजाची आरक्षण वाचविण्यासाठी महाएल्गार सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून ओबीसी नेते आणि सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. जरांगेंचा एकेरी उल्लेख करत कोणाचे खाता कोणाचे खाता? असे म्हणतो, पण तुझे खातो काय रे? तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे, असा सल्ला भुजबळांकडून देण्यात आला आहे. भुजबळांनी केलेल्या या टीकेवर संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, भुजबळांच्या या भाषणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis who made Chhagan Bhujbal to speak, Anjali Damaniya’s claim stirs up excitement)

हेही वाचा – संभाजीराजे छत्रपती छगन भुजबळांवर संतापले, मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची सरकारकडे मागणी

- Advertisement -

आर्थिक घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया या छगन भुजबळ यांच्यावर कायमच लक्ष ठेवून असतात. आर्थिक घोटाळ्यात छगन भुजबळ यांना तुरुंगावारी करायला लावण्यात अंजली दमानिया यांचा मोठा हात होता. त्यामुळे दमानिया आणि भुजबळ यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. परंतु, आज छगन भुजबळ यांनी ओबीसी सभेत केलेल्या भाषणावर दमानिया यांनी निशाणा साधला आहे. “कुठेतरी असे वाटते की भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे. आता तावा तावाने भुजबळ कसे बोलतात पाहा …. आता छातीत कळ नाही येत ? जेलमधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे.” अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटला केली आहे. त्यामुळे दमानियांनी यावेळी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आरोप केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

ओबीसींच्या महाएल्गार सभेतून छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका करत म्हटले की, कोणाचे खाता कोणाचे खाता? असे म्हणतो, पण तुझे खातो काय रे? तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. जे हजारो वर्षे दबले-पिचलेले होते, त्यांना सर्वांसोबत आणण्यासाठीची समता प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे, हे समजून घेतले पाहिजे, असेही यावेळी भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -