घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis: भुजबळ भाजपात प्रवेश करणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर फडणवीसांच मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: भुजबळ भाजपात प्रवेश करणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर फडणवीसांच मोठं वक्तव्य

Subscribe

मुंबई: छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीटरवर आताच्या एक्सवर लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis Will Bhujbal join BJP Devendra Fadnavis big statement on Anjali Damania s claim)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेत असतो, अंजली दमानिया आमचे निर्णय घेत नाहीत. अंजली दमानिया अलीकडच्या काळात सुप्रिया सुळेंच्या अधिक संपर्कात आहेत, त्यामुळे त्या अशा पोस्ट टाकत असतील. पण छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहेत, आम्ही आमच्या पक्षात आहोत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

- Advertisement -

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

भुजबळ भाजप च्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी एक्सवरील पोस्टमधून उपस्थित केला होता.

- Advertisement -

मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आक्रमकपणे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडत आहेत. काही वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक्सवर छगन भुजबळांवरील आरोपांचा संदर्भ घेत भाजपाला लक्ष्य केलं आहे. अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भुजबळांची प्रतिक्रिया काय?

अंजली दमानिया यांच्या पोस्टवर मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, त्यांना कशी माहिती मिळाली. हे मला माहिती नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असं काही नाही, असं काही प्रपोजल मला आलेलं नाही. पक्षात काय घुसमट आहे? मी मंत्री आहे, माझ्या विरुद्ध अजून तरी कोणी काही बोललेलं नाही. मी जे काही करत आहेत त्याबाबत अजित पवारही म्हणाले आहेत की, ओबीसींचं काम करत आहेत. त्यांना तो हक्क आहे, तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलतात तसे ते देखील त्यांच्या समाजाबाबत बोलत आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

(हेही वाचा Parliament Budget Session: खर्गे म्हणाले, अब की बार 400 पार…; अन् सभागृहात पिकला हशा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -