नागपूर: ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सहृयाद्री येथे आज सायंकाळी बैठक होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आज नागपूरात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षण आणि ओसीबी आरक्षण या मुद्यांवर बोलले आहे
ओबीसी समाजाचे ही आंदोनल सुरू आहे, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काहीही झाले, तरी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. जी काही भीती ओबीसी समाजाच्या मनात आहे. आमचे आरक्षण कमी होणार किंवा आरक्षण काढून घेणार. तर अशा प्रकारचा कोणताही हेतू सरकारचा नाहीये. यामुळे ओबीसी समाजाला विनंती आहे की, त्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. दोन समाज समोरा-समोरा यावे. अशा प्रकारचा कुठलाही निर्णय राज्य सरकार होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे कोणी प्रयत्नही करू नये.
ओबीसी समाजाच्या नेत्यांनी कोणतेही वक्तव्य…
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “कुठला ही मसाजाच्या नेत्यांनी कोणतेही वक्तव्य करताना इतर समाजही शेवटी आपल्या समाजाचे घटक आहेत. त्यामुळे कुठलाही समाज दुखावला जाणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. ओबीसी समाजाला आमच्या सरकारच्या वतीने आश्वस्त करून इच्छतो की, कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही.”
हेही वाचा – जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच अडकलेत…; भीमाशंकर यात्रेवरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राजकारण न करता चर्चा करण्यासाठी बैठक
फडणवीस म्हणाले, “सरकार, विरोधी पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल. या सर्वांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. आजच्या बैठकीचा प्रयत्न हात असणार आहे की, योग्य निर्णय घेण्यासाठी बैठक आहे. आपल्या कुठल्या मार्गाने जाता येईल. मराठा समाज असो किंवा तर कोणत्याही समाजाचे प्रश्न समोर येत आहेत. विशेष: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे प्रश्न ऐरणीवर आला आहेत. जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि इतरही मराठा समाज संघटनांच्या मान्या आहेत. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून राज्याने याच्यावर राजकारण न होता. समाजाच्या हिता निर्णय कसा घेता येईल, असा प्रयत्न आम्ही करत आहोत.”