Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र सरकार कधी कोसळणार हे मी सांगितलं नाही पण जेव्हा कोसळेल तेव्हा...; फडणवीसांचं...

सरकार कधी कोसळणार हे मी सांगितलं नाही पण जेव्हा कोसळेल तेव्हा…; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार की नाही याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हे सरकार स्वत:च्या ओझ्याने पडणार आहे. हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. हे आज कोसळेल, उद्या कोसळेल असं भाकित मी कधीच केलं नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्यादिवशी पर्यायी सरकार देऊ, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये स्वबळाच्या नाऱ्यावरुन धुसफूस सुरु आहे. त्यामुळे हे सरकार अस्थिर झालं की काय अशा चर्चा आहेत. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले एक बोलतात, त्यावर शरद पवार नाना पटोलेंवर एक मत व्यक्त करतात. त्यानंतर त्यांचे काही लोक शरद पवार यांना नाना पटोले यांना घेऊन न जाता भेटतात. यातून समजू शकतो काय चाललं आहे, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, या प्रकारावरुन आघाडीमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. या अस्थिरतेच्या चित्रावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आमची काहीच तयारी नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून भूमिका ठेवली आहे, आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. विरोधी पक्षात काम करणार आहोत. लोकांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत. लोकांकरिता आम्ही संघर्ष करणार आहोत. हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. हे काय आज कोसळे, उद्या कोसळे याबाबत भाकित मी कधीच केलं नाही. ज्या दिवशी कोसळेल त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ,” असं फडणवीस म्हणाले.

पेट्रोल-डिझेल दरवाढीची आंदोलनं ही काँग्रेसची नौटंकी

- Advertisement -

गेल्या वर्षी पेट्रोल-डिझेलवर राज्याला २४ हजार कोटी रुपये मिळाले. आता हजार-दीड हजार कोटी कमी केले तरी तेवढेच मिळतील, त्यामुळे राज्याला जर मनात असेल तर ते निर्णय घेऊ शकतात. पेट्रोल-डिझेल दरवाढीची आंदोलनं ही काँग्रेसची नौटंकी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

सत्ताधारी कशाला घाबरताहेत?

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का? हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.


- Advertisement -

हेही वाचा – इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठिंबा देऊ – फडणवीस


 

- Advertisement -