घरताज्या घडामोडीपॅकेज म्हणा, मदत म्हणा, मात्र आधी घोषणा करा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे...

पॅकेज म्हणा, मदत म्हणा, मात्र आधी घोषणा करा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

पूरग्रस्त भागाचे कर्ज माफ करावे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाचा दौरा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त भागातील तीन दिवसीय दौऱ्यावर आहे. रायगड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली भागातील नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे या नागरिकांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच पॅकेज म्हणा, मदत म्हणा, मात्र आधी घोषणा करा अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, नुकसानग्रस्त नागरिकांशी चर्चा करण्यासठी ३ दिवस दौरा केला या दौऱ्यात २२ ठिकाणांचा आढावा घेतला. दरड, भूस्खलन झालेल्या भागात, पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. एकूणच सामान्य माणसांच्या हाल अपेक्षा, अडचणी समजूण घेतल्या आहेत.

- Advertisement -

यंदाच्या पूराचे सांगली आणि कोल्हापूरचे विश्लेषण झाले तर याचा अभ्यास करावा लागेल याचे कारण म्हणजे २००५ मध्ये महापूर झाला तेव्हा १५९ टक्के पाऊस २१ दिवसात झाला आणि २०१९ मध्ये सरासरीपेक्षा ४८० टक्के पाऊस जास्त झाला तो ९ दिवसात झाला. तर आता सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आणि ५ दिवसांत झाला आहे. सांगलीमध्ये २००५ साली २१७ टक्के पाऊस २१ दिवसात झाला होता. २०१९ मध्ये ७५८ टक्के सरासरीपेक्षा जास्त ९ दिवसांत पाऊस झाला होता तर आता सांगलीमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस झाला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे एकूणच पाऊस खुप मोठ्या प्रमाणात नाही आहे. अलमट्टीचे विसर्ग सुरु आहे. राधानगरीमध्ये जास्त विसर्ग नाही आहे. आपत्तीची पूररेषा ही २०१९ च्याही वर आहे. या पुराकडे गांभीर्याने पाहावं लागेल. पाऊस न होता आणि विसर्ग न होता हे पाणी का साचले याचा विचार करावा लागेल असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुरपरिस्थितीमध्ये ३९६ गावे बाधित २ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना स्थलांतर करण्यात आले आहे. तर ६० हजारपेक्षा अधिक क्षेत्रावरचं शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि शाळांचेही नुकसान झाले आहे. घर आणि दुकानांसदर्भातही मोठं नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने तातडीची मदत यायला हवी होती ती अद्यापही आलेली नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनीही अनुभव घेतला आहे की, २०१९ च्या मदतीचा नागरिक उल्लेख करत होते. शेवटी एखादी आपत्ती आल्यानंतर त्या आपत्तीनंतरची उपाययोजना महत्त्वाचा भाग असतो ज्यामध्ये आपल्याला रेस्टोरेशन करायचे असते. सफाई करायची म्हटली तरी खर्च आहे. तात्काळ काही गोष्टी विकत आणाव्या लागतात एवढी वाईट परिस्थिती असते. तातडीची मदत अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून सरकारने तातडीची मदत अद्याप दिली नाही उशीर झाला आहे तरी सरकारने मदत करावी अशी आपेक्षा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

व्यापाऱ्यांना दिलास दिला पाहिजे

दुकानांतील व्यापारी कोरोनामुळे आणि आता माल खराब झाल्यामुळे मोठ्या अडचणीत आले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना मदत दिली पाहिजे २०१९ च्या पुरानंतर आम्ही मदत केली होती. पाणी शिरल्यामुळे काही लोकांचे मीटर खराब झाले आहेत. २०१९ साली निर्णय केला होता की महावितरणच्या खर्चातून मीटर बदली केलं पाहिजे.

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे

शेतकऱ्यांच्या पीकाचे आणि जमिनीचे नुकसान झाले आहे. अनावश्यक घाण, माती येऊन बसली आहे यामुळे ती साफ करावी लागणार आहे. पूरग्रस्त भागाचे कर्ज माफ करावे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. कुंभार समाज गणेश मुर्ती तयार करतात त्यांची भेट घेतली आहे. ६० हजार मुर्ती या परिस्थितीमध्ये खराब झाले आहेत. आता ते लोक अडचणीत आहेत यामुळे त्यांना मदत केली पाहिजे. बिनव्याजी कर्ज कुंभार समाजाला कसं देता येईल यावर विचार केला पाहिजे.

बास्केट ब्रीजचा प्रकल्प मार्गी लावा

कोल्हापूरमध्ये मागच्या काळात मागे लागून बास्केट ब्रीजचा प्रस्ताव आणला होता या साठी केंद्राने निधी दिला आहे परंतू त्यामध्ये दिरंगाई होत आहे. याचा विचार जर राज्य सरकारे केला तर बऱ्याच अडचणी दूर होतील. २०१९ च्या पुरात कोणते रस्ते पुराखाली गेले याचा सर्व आराखडा तयार करण्यात आला होता. निवडणूका लागल्या आणि आमचे सरकार गेले आहे. परंतू तो आराखडा कोल्हापूरला पुरातून बाहेर काढण्यासाठी योग्य आहे. पूराच्या संदर्भात जी काही उपाययोजना करत आहे यामध्ये लॉंगटर्म उपाययोजना करावा लागेल. कृष्णा भीमा स्थिरिकरण आणि पाणी दुष्काळी भागाकडे कसे नेता येईल याचा विचार केला पाहिजे. पुराचे पाण्यावर ही योजना करुन दुष्काळी भागाकडे नेता येईल. मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि त्याना विनंती केली की याबाबत बैठक बोलवा आणि या आराखड्यावर चर्चा करावी मुख्यमंत्री ठाकरेंनी याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -