घरदेश-विदेशआम्हाला सरकार पाडण्यात रस नाही

आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही

Subscribe

अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आता करोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे करोनाच्या संदर्भात आणि शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली करोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास त्यांनाही महाराष्ट्रातली परिस्थिती सांगणार आहे. सध्या राज्यात काय चाललं आहे.. काय झालं पाहिजे यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ही भेट राजकीय मुळीच नव्हती. ठाकरे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. हे सरकार तीन पक्षांच्या अंतर्विरोधाने कोसळणार आहे. जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा काय करायचे ते पाहू. आज मी अमित शाह यांना भेटलो यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. कोरोनाची महाराष्ट्रातली स्थिती आणि शेतकर्‍यांची परिस्थिती या दोन गोष्टी मी त्यांच्याशी बोललो.

- Advertisement -

राजस्थानात जे काही घडले त्यावरुन महाराष्ट्रातील सरकारबद्दल हा प्रश्न विचारला गेला, असे जेव्हा फडणवीस यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की, मी महाराष्ट्रातला माणूस आहे. देशात काय चालते, इतर राज्यांमध्ये काय चालते ते मला ठाऊक नाही. मी महाराष्ट्रातला नेता आहे. साखरेशी संबंधित विषयात शरद पवार यांचे नाव पुढे आले नाही असे विचारले असता, शरद पवार त्यांचे काम करत आहेत आणि आम्ही आमचे काम करत आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. महा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला असून, आपापसात मारामार्‍या करा; पण लोकांची कामे करा, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

आपसात मारामार्‍या करा; पण लोकांची कामे करा
महा जॉब्स पोर्टल संदर्भातील जाहिरातींवरून काँग्रेसने नाराजी जाहीर केली होती. त्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना फडणवीस म्हणाले की,आमचे म्हणणे एवढेच आहे की, फोटो कुणाचेही छापा. पण, तुम्ही ज्या मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. इतक्या लोकांना रोजगार देऊ, इतक्या लोकांना नोकर्‍या मिळतील. इतक्या कंपन्या येतील. त्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही करा. बाकी तुम्हाला ज्याचे फोटो छापायचे आहेत आणि ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत, त्यांचे दाखवा. आपापसात मारामार्‍या करा, काहीही करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे असा विचार करा, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -