घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस है तो मुमकीन है, महाराष्ट्राच्या राजकारणाला सुरूंग लावणारा अजातशत्रू

देवेंद्र फडणवीस है तो मुमकीन है, महाराष्ट्राच्या राजकारणाला सुरूंग लावणारा अजातशत्रू

Subscribe

महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ३० हून अधिक आमदारांसह सूरतमध्ये मुक्कामी आहेत. तर दुसरीकडे सरकार वाचवण्यासाठी शिंदे यांनी मविआपुढे काही अटी शर्थी ठेवल्या आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षाची पुरती गोची झाली आहे. तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी भाजपचे अजातशत्रू देवेंद्र फडणवीस दिल्लीस रवाना झाले आहेत. यामुळे  महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामागे फडणवीस असल्याचे प्रत्येकेवळी बोलले जाते. याआधीही फडणवीस यांनी आपल्या राजकीय खेळींनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सळो का पळो करुन सोडले आहे.  त्यातच फडणवीस हे त्या चिमूटभर नेत्यांपैकी आहेत ज्यांच्यावर कसलाही ठपका नाही किंवा कुठल्या स्रॅंडलमध्ये त्यांचे नावही नाही. याच स्वच्छ चारित्र्यामुळेच फडणवीसांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करणं सहज जमतय. तसेच राजकारणाच्या मैदानात  शत्रूला नामोहराम करण्यासाठी जे काही कौशल्य लागते त्यात फडणवीस तज्ज्ञ आहेत. कुठे काय बोलायचं कोणत्या मुद्यावरून समोरच्यावर वरचढ व्हायचं आणि कुठे फक्त स्मितहास्य करत त्याला गाफील ठेवून चारीमुंड्याचीत करायचे यात फडणवीस माहिर आहेत.  याच  मुळे सत्ताधारी पक्षातील नेतेही फडणवीस यांना वचकून असल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळाले आहे. फडणवीस हे मुरलेले, मुत्सद्दी, चाणाक्ष राजकारणी असून गेल्या अडीच वर्षात अनेक वेळा त्यांना आपले हे राजकीय कौशल्य दाखवण्याच्या संधी मिळाल्या आहेत. २०१९ साली पहाटे झालेल्या शपथविधी कार्यक्रमाची नाट्यमय घटना फडणवीसांच्या जिव्हारी लागली असून त्याचाच वचपा ते संधी मिळेल तेव्हा काढत असल्याचे बोलले जाते. २०१९ साली भाजप शिवसेनेने विधानसभा निवडणुक एकत्र लढवली होती. त्यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार सत्तेत येणार हे देखील निश्चित झाले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला जोरदार झटका देत काँग्रेस , राष्ट्रवादीबरोबर वेगळी चूल मांडत मविआचे सरकार स्थापन केले. यामुळे भाजपचे सत्तेवर येण्याचे स्वप्न भंगले. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अनेकवेळा भाजप शिवसेनेमध्ये उडालेला संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने बघितला आहे. यासर्व घटनांमागे देवेंद्र फडणवीसांची राजकीय खेळी होती हे सर्वश्रुत आहे. फडणवीस हे चाणाक्ष राजकारणी असून विरोधकांवर संपूर्ण तयारीनीशी तुटून पडण्याचे त्यांचे कौशल्य आहे.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्येही देवेंद्र फडणवीसांनी हाच फंडा वापरून यशस्त्री खेचून आणली . विधानपरिषद निवडणुकीच्या निकालातूनही शिवसेनेची मत भाजपने मिळवल्याचे समोर आले आहे . यामागे देवेंद्र फॅक्टर कसा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गढ असलेल्या बारामतीत २९ जुलै २०१४ रोजी धनगर समाजाने आंदोलन केले होते. धनगर समाजाला अनुसूचित जनजमातीमध्ये सामील करून घ्यावे अशी मागणी आंदोलनकरत्यांनी केली होती. याबद्दल जेव्हा तत्कालिन भाजप प्रदेश अध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीसांना कळाले तेव्हा ते तातडीने आंदोलनस्थळी हजर झाले. तसेच त्यांनी धनगर समाजातील नेत्यांची भेट घेत आमचे सरकार आल्यास धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी याच समाजाचे प्रमुख नेते गोपीनाथ पडळकर यांना भाजपमध्ये सामील केले आणि अजित पवार यांच्याविरोधात बारामतीमध्येच निवडणुक लढण्यासाठी मैदानात उतरवले होते. तेव्हाही महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य असलेल्या शरद पवार यांना फडणवीसांनी आपल्या राजकीय ज्ञानाची चुणूक दाखवली होती. आणि आजही महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामागे फडणवीसच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याने फडणवीस है तो मुमकीन है असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -