देवेंद्र रात्री वेष बदलून एकनाथ शिंदेंना भेटायचे, अमृता फडणवीसांकडून गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट

देवेंद्र रात्री वेष बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे, असं एका मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राज्यात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

amruta fadnavis and devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी युती करून नाट्यमयरित्या राज्यात सत्ता स्थापन केली आहे. अगदी जून महिन्याच्या मध्यापर्यंत एकमेकांच्या विरोधात बसलेले नेते एकत्र येत सत्ता स्थापन करतील असं कोणा राजकीय तज्ज्ञालाही वाटलं नव्हतं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची आघाडी मोडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांना केली. पण उद्धव ठाकरे यांनी आघाडीलाच पाठिंबा देत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेसाठी काय प्लान आखला, कसा आखला असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. या दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मोठा खुलासा केला आहे. (Devendra used to meet Eknath Shinde in disguise at night, Amruta Fadnavis reveals about secret meeting)

हेही वाचा – फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अमृता फडणवीसांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…

देवेंद्र रात्री वेष बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे, असं एका मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राज्यात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अमृता फडणवीस मुलाखतीत म्हणाल्या की, “देवेंद्र रात्री वेष बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे. यादरम्यान वेगळाच पोशाख करून, डोळ्यांवर मोठा गॉगल लावून ते घराबाहेर पडायचे. मलाही ओळखू यायचे नाहीत.”

हेही वाचा – महाराष्ट्राच्या स्थैर्य, समृद्धीसाठी अमृता फडणवीस लंडनमध्ये, पाहा फोटो

सगळे झोपल्यावर देवेंद्र फडणवीस यांना मी भेटायला जायचो, असं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटलं होतं. आता अमृता फडणवीसांनीही त्यांचीच री ओढल्याने सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या गुप्त भेटी रात्रीच होत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर विधानसभेच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनीही भेटीबाबतचा खुलासा केला होता. आमच्यातील वाटाघाटीसाठी आणि चर्चांसाठी सगळे आमदार झोपल्यावर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो, चर्चा करायचे आणि आमदार झोपेतून उठायच्या आतमध्ये मी हॉटेलवर यायचो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा – अमृता फडणवीस यांचा जबरदस्त मेकओव्हर

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं. त्यावरुन असं लक्षात येतं की आमदारांमध्ये किती अनरेस्ट होता. त्यामुळे कुठे ना कुठे तो अनरेस्ट निघणारच होता. मग भाजपने त्याला वाट मोकळी करुन देण्याचं काम केलं आणि देवेंद्र त्यांच्यामागे उभे राहिले आहेत, तर ते चांगलंच आहे.”