Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र देवेंद्रजी, सत्यजित तांबेना पाठींबा देणार ना?, सोशल मीडियावर तो फोटो तुफान व्हायरल

देवेंद्रजी, सत्यजित तांबेना पाठींबा देणार ना?, सोशल मीडियावर तो फोटो तुफान व्हायरल

Subscribe

Satyajeet Tambe | सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत आम्हाला माहित नव्हतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. त्यामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली.

नाशिक – विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात काँग्रसने मोठा धमाका केला आहे. सत्यजित तांबेंना काँग्रेसने पाठिंबा नाकारला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे आता भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होतोय. त्या फोटोत सत्यजित तांबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर काळं फासताना दिसत आहेत.

विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकमधून काँग्रेसने डॉ.सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, सुधीर तांबे यांनी उमेदवारी नाकारली. त्याजागी त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते काँग्रेसमधून उमेदवारी भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र, सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत आम्हाला माहित नव्हतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. त्यामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, सत्यजित तांबेंनी पाठिंबा मागितल्यास आम्ही पाठिंबा देण्याचा विचार करू असं, भाजपा प्रदेशाध्यक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनीही याआधीच सत्यजित तांबेंच्या भाजपा प्रवेशाबाबत संकेत दिले होते. त्यामुळे सत्यजित तांबे या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाजवळ जाण्याची शक्यता आहे. परंतु, त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सत्यजित तांबे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं होतं. कालपासून त्यांचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोलो काळं फासणाऱ्या व्यक्तीला देवेंद्रजी सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार ना? असा सवालही उपस्थित केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -