घरमहाराष्ट्रगणपतीपुळ्याला निघालेले दोन भाविक ठार; चार जण जखमी

गणपतीपुळ्याला निघालेले दोन भाविक ठार; चार जण जखमी

Subscribe

गणपतीपुळे येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

गणपतीपुळे येथे गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

पुणे जिल्ह्यातील काही भाविक गणपतीपुळ्याला दर्शनासाठी गेले होते. त्या दरम्यान रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. मित्राचा वाढदिवस असल्याने वाढदिवसाची सुरुवात देवदर्शनानी करावी यासाठी हे मित्र गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी जात होते. त्यादरम्यान त्यांची गाडी रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावरील दाभोळेजवळ पोहोचली. या गाडीचा वेग अधिक असल्याने ही भरधाव गाडी झाडाला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वाचा – औरंगाबादमध्ये पिकअप – ट्रकचा भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू

वाचा – कोल्हापूरात शिवशाही बसला अपघात; वाहकाचा मृत्यू तर १६ प्रवासी जखमी

- Advertisement -

वाचा – ढोलपथकावर काळाचा घाला; अपघातात ५ जण ठार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -