पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त लाखो भाविक जमले होते. याचवेळी अनेक भाविकांनी पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला होता. परंतु माघी एकादशीच्या निमित्ताने उपवास असलेल्या भाविकांनी या मठामध्ये बुधवारी रात्री भगर आणि आमटी खाल्ली. याच्या काही तासानंतर अनेक भाविकांना उलटी, मळमळीचा त्रास जाणवू लागला. ज्यामुळे तात्काळ बाधित झालेल्या भाविकांना गुरुवारी पहाटे पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, माघी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. माघी एकादशीच्या तीन दिवस आधीपासूनच अनेक भाविक पंढपूरमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केलेल्या भाविकांनी उपवासाच्या पदार्थामध्ये असलेली भगर आणि आमटी खाल्ल्याने भाविकांची तब्येत खालावली.
हेही वाचा – निवडणुकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाची फसवणूक
भगर आणि आमटी खाल्ल्याने भाविकांना मळमळ, उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागला. विषबाधा झालेल्या सर्व भाविकांना तात्काळ पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल १३७ भाविकांना या अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सादर घटनेनंतर अन्न-औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची भेट घेतली.
हेही वाचा – मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; संपू्र्ण जानेवारी महिना ठरला प्रदूषित
दरम्यान, उपवासासाठी पंढरपूरमधील मर्दा या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अन्न-औषध प्रशासनाकडून भाविकांना विषबाधा झालेल्या पदार्थाचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच या घटनेचा अधिक तपास देखील करण्यात येत आहे. सध्या विषबाधा झालेल्या सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
FPO रद्द केल्यानंतर गौतम अदानींचे व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण, म्हणाले…https://t.co/UM1vYeeWGU
— My Mahanagar (@mymahanagar) February 2, 2023