आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील जनतेला अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

 राज्यात यंदाही पाऊसपाणी चांगले होऊ दे... शेतकऱ्याच्या शिवारात पिकपाण्याची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे... राज्यावरचे बेरोजगारीचे, महागाईचे संकट दूर कर..., अशा शुभेच्छा अजित पवार यांनी असे साकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पांडुरंगाला घातले.

ajit pawar

राज्यात यंदाही पाऊसपाणी चांगले होऊ दे. शेतकऱ्याच्या शिवारात पिकपाण्याची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे. राज्यावरचे बेरोजगारीचे, महागाईचे संकट दूर कर. या राज्यातल्या बळीराजाला यश दे. त्याच्यासह राज्यातला प्रत्येक जण निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी राहूदे. महाराष्ट्राच्या विकासाची, विठ्ठलभक्तीची, संतपरंपरेची, अध्यात्माची पताका यापुढेही अशीच उंच फडकत राहूदे, असे साकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पांडुरंगाला घातले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या, माता रुक्मिणीदेवींच्या चरणी वंदन केले असून श्रीविठ्ठलभक्तीने न्हाऊन निघालेल्या, बा पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचं अंतर पायी चालून पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींनाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भक्तीपूर्ण वंदन केले आहे. राज्यातील नागरिकांनाही त्यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आषाढी एकादशीनिनिमित्तानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी राज्याच्या कल्याणासाठी साकडे घातले. राज्यावरचे, देशावरचे कोरोनाचे संकट कमी केल्याबद्दल अजित पवार यांनी बा पांडुरंगाचे आभार मानले असून श्रीविठ्ठलभक्तीची, एकतेची, समतेची, पंढरपूरच्या वारीची परंपरा ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ताकद असून ही परंपरा यापुढे शेकडो वर्षे अशीच अखंड सुरु राहील, असा विश्वासही राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा –

शांती व त्यागाचं प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.